‘बोफोर्स’प्रकरणी अ‍ॅटॉर्नी जनरल यांचा केंद्र सरकारला सल्ला – eNavakal
News देश

‘बोफोर्स’प्रकरणी अ‍ॅटॉर्नी जनरल यांचा केंद्र सरकारला सल्ला

नवी दिल्ली – बोफोर्स प्रकरणात विशेष अनुमती याचिका दाखल करु नये, असा सल्ला अ‍ॅटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी आज केंद्र सरकारला दिला. दिल्ली हायकोर्टाने 31 मे 2005 मध्ये घोटाळ्यातील आरोपींना दोषमुक्त केले होते. युरोपमधील हिंदूजा बंधू या प्रकरणातील आरोपी होते. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता.
सीबीआयच्या विनंतीनंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) याबाबत अ‍ॅटॉर्नी जनरल यांच्याकडून मत मागवले होते. वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे त्यांचे मत मांडले. ‘निकालाला 12 वर्षांचा कालावधी झाला आहे. आव्हान देण्यास विलंब झाल्याने ही याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली जाऊ शकते’, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. निर्णयाला आव्हान देण्यास विलंब का झाला याबाबत कोणतेही ठोस कारण दिसत नाही. यात भर म्हणजे विद्यमान सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरही स्पष्टीकरण देणे कठीण असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More