बोपण्णा – शरण जोडी अजिंक्य – eNavakal
क्रीडा

बोपण्णा – शरण जोडी अजिंक्य

पुणे – भारताच्या  रोहन बोपण्णा – दिवीज शरण जोडीने येथे झालेल्या महाराष्ट्र ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत जेतेपदाचा मान मिळवला. या स्पर्धेत प्रथम मानांकन देण्यात आलेल्या भारतीय जोडीने अंतिम सामन्यात ब्रिटनच्या लुक – जॉनी जोडीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. बोपण्णा – शरण जोडीने हा सामना 6-3, 6-4 असा जिंकला. एटीपी टुर स्पर्धेतील भारतीय जोडीचे हे पहिलेच विजेतेपद होते. त्याअगोदर उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने सिमोन – डॉडीग जोडीचा पराभव केला होता. बोपण्णाचे कारकिर्दीतील हे 18 वे तर दिवीजचे हे चौथे विजेतेपद होते. गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत या जोडीने सुवर्णपदक पटकावले होते. यंदाच्या नव्या मोसमात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात एकत्र खेळण्याचा निर्णय त्यांनी गेल्याच महिन्यात घेतला होता. आता आगामी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सहभागी होतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More