बोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार करुन एलआयसी फसवणुक – eNavakal
News गुन्हे

बोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार करुन एलआयसी फसवणुक

मुंबई – बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट तयार करुन भविष्य निर्वाह निधीची (एलआयसी) फसवणुक करणार्‍या दोघांना सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात डॉ. राकेश रामप्रकाश दुग्गल आणि टेक्निशियन किशोर पांडुरंग सकपाळ यांचा समावेश आहे. या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेज हस्तगत केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना न्यायालयाने गुरुवार 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे पर्दाफाश झालेली ही पहिलीच टोळी असल्याचे बोलले जाते.

सांताक्रुज येथील वाकोला, दत्त मंदिर रोडवरील दत्तात्रय नर्सिंग होममध्ये एलआयसीसाठी आवश्यक असलेल्या बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट तयार करुन ते रिपोर्ट काही ग्राहकांना दिले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सोमवारी सायंकाळी संबंधित दत्तात्रय नर्सिंग होमममध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी विविध पेशंटच्या दिनांकवार नोंद लिहिलेले मेडीकल सेंटर रजिस्टर पेशंट नोटवही, चौदा वेगवेगळे स्टॅम्प, विविध डॉक्टरच्या नावाने कागदपत्रे, त्यांचे नावाने असलेले स्टॅम्प, कुर्ला मेडीकल सेंटरचे काही आक्षेपार्ह कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क आदी मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस तपासात या नर्सिंग होममध्ये एलआयसीसाठी आवश्यक असलेल्या बोगस वैद्यकीय रिपोर्ट तयार केले जात होते. ते रिपोर्ट डॉ. राकेश दुग्गल, टेक्निशियन किशोर सकपाळ हे इतरांच्या मदतीने बनवित होते. त्यासाठी संबंधित पेशंट असलेल्या ग्राहकांकडून कमिशन म्हणून ठराविक रक्कम घेतली जात होती. संबंधित रिपोर्ट नंतर एलआयसीसोबत जोडले जात होते. अशा प्रकारे संबंधित लोकांनी बोगस वैद्यकीय चाचणी रिपोर्ट सादर करुन एलआयसीची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर डॉ. राकेश दुग्गल व त्याचा टेक्निशियन सहकारी किशोर सकपाळ या दोघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More