बोगस पावत्याद्वारे पैसे उकाळणार्‍या आरोपीस अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

बोगस पावत्याद्वारे पैसे उकाळणार्‍या आरोपीस अटक

मुंबई – पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये बोगस पावत्याद्वारे वाहनचालकाकडून पैसे उकाळणार्‍या एका आरोपीस विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. शिवा नायगा स्वामी असे या आरोपीचे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळवर असलेल्या पे अ‍ॅण्ड पार्क परिसरात काहीजण बोगस पावत्याद्वारे वाहनचालकाकडून पैसे उकाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर विमानतळ पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून शिवा स्वामी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने बोगस पावत्या बनवून वाहनचालकाकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकारी असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. एका दक्ष नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरुन या
प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More