बॉलिवूडची सुपरमॉम, अभिनेत्री काजोल – eNavakal
दिनविशेष लेख

बॉलिवूडची सुपरमॉम, अभिनेत्री काजोल

सध्याच्या काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्रींमध्ये समावेश होत असलेल्या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून आहे. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कातर पटकावलेली नामांकित अभिनेत्री. पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली तयार झालेली काजोल. काजोलचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी झाला. मुंबईत इतकेच नव्हे तर काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे देखील त्यांच्या काळातील गाजलेले कलावंत. शाळेत शिकत असतांना तिला पहिला ब्रेक मिळाला. काजोलचा पहिला चित्रपट ‘बेखुदी’ हा होता. काजोलने ‘बेखुदी’ या चित्रपटाच्या माध्यामातून जेव्हा बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या पदरी पडली साफ निराशा. काजोल दिसायला सर्वसामान्य तरुणींसारखीच सामान्य. पण ‘बाजीगर’मध्ये नवख्या शाहरुख सोबत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलीवूडमधले आपले स्थान पक्के केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले.

शाहरुखच्या यशामागे काजोल सोबत जमलेली केमिस्ट्री हा देखील महत्वांचा विषय म्हणला पाहिजे. मात्र त्यानंतरच्या अनेक चित्रपटात तिने अनेक उल्लेखनीय भूमिका केल्या . त्यातत हळुवार प्रेमाची अनुभूती देणारी दिलेवाले… मधली सिमरन असो किंवा ‘गुप्त’ मधली आक्रमक खलनायिका. अनेक चित्रपटात तिने अभिनयाची जादुगरी दाखविली. त्यानंतर तिने शाहरूख सोबत करण-अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम यासारखे अनेक हीट चित्रपट केले. त्या‍तील ‘दिलवाले…’मध्ये आजही जोरदार गर्दी खेचण्याची क्षमता आहे. या चित्रपटानेच तिला पहिल्यांदा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळवून दिला.

काजोल आणि अजय देवगन यांनी १९९९ मध्ये लग्न केले. दोघांची भेट ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळू हळू दोघांची दोस्ती आणि प्रेम जुळले. त्यांचे लग्न पारंपरिक मराठी पद्धतीने झाले होते. बॉलीवूडमध्ये लग्न झालेल्या हिरोईनचे करीअर नंतर पूर्णतः संपल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र लग्नानंतरही काजोलने पती अजय सोबतही यशस्वी चित्रपट केले. त्यात कभी खुशी कभी गम या हीट चित्रपटाचाही समावेश आहे. काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला. आमीर खान सोबत तिने ‘फना’ हा तर पती अजय सोबत ‘यु मी और हम’ हा हीट चित्रपट दिला. तर शाहरुखच्या ‘ओम शाती ओम’मध्ये आपल्या नृत्याचे जलवे दाखविले. तिने पतीसोबत चित्रपट निर्मिती व्यवसायातही पाउल टाकले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More