बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना हा करार मान्य नसल्याने त्यांनी पुनर्विचाराची मागणी करीत करारावर सह्या करण्यास नकार दिला. बेस्ट प्रशासनाने या कामगार संघटनांवर दबाव आणण्यासाठी करार व मानणार्‍या युनियनच्या सदस्य कामगारांना बोनस देण्यास नकार दिला आहे. या विरोधात रयतराज कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात
धाव घेतली.
आज या प्रकरणी न्या. डोरले यांच्या कोर्टात सुनावणी झाली. रयतराज कामगार संघटनेतर्फे अ‍ॅड. अरविंद तापोळे यांनी युक्‍तिवाद केला तर प्रशासनातर्फे सहाय्यक कर्मचारीय व्यवस्थापक सयाजी सांगळे उपस्थित होते. यानंतर 22 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, न्या. डोरले यांनी संघटनेला सुचविले की कराराच्या आक्षेपार्ह मुद्यांवर लेखी आक्षेप घेऊन करारावर सही करा. मात्र रयतराज कामगार संघटनेने यास साफ नकार दिला. या एमओयूवर सही केली की यातील सर्व मुद्दे प्रशासन आमच्यावर अंतिम करारात लादतील यासाठी आम्ही सही करणार नाही असे संघटनेने स्पष्ट केले.
बेस्ट प्रशासनाने आज न्यायालयात बोनसबाबत गोलमाल उत्तरे दिली. बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस देणार हे जाहीर केले असले तरी किती बोनस देणार आणि कधी बोनस देणार हे आम्ही सांगू शकत नाही. आचारसंहिता असल्याने पालिका किती मदत देणार याबाबत ठराव मंजूर झाला नसल्याने बोनसबाबत निश्‍चित काहीच सांगू शकत नाही असे बेस्ट प्रशासनाने
कोर्टात सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

७०५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जीव्हीकेचे अध्यक्ष व पुत्रावर गुन्हा

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासात ७०५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचा मुलगा जीव्ही...
Read More
post-image
विदेश

बोत्सवाना देशात ३५० हत्तींचा रहस्यमय मृत्यू

गॅबोरोने – आफ्रिकेमधील बोत्सवाना देशात मागील काही दिवसांमध्ये ३५० हत्तींचे मृतदेह सापडले आहेत. जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या या हत्तींच्या मृतदेहांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सुशांतच्या सर्व लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. सुशांतच्या गाड्या विकत घेण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. सुशांतने...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

बीड शहरात ९ जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन

बीड – बुधवारी बीड शहरात कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले. यातील एका रुग्णाने बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले. या रुग्णालयाच्या माध्यमातून...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोरोनाबाधा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात आता वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी...
Read More