बेस्ट कामगारांना पगारात मिळणारे भत्ते बंद – eNavakal
News मुंबई

बेस्ट कामगारांना पगारात मिळणारे भत्ते बंद

मुंबई :
बेस्ट बसची मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख आहे. लाखो मुंबईकरांना रोज सुरक्षित प्रवास घडविणार्‍या बेस्टच्या कामगारांवर बेस्ट कमिटीच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे अन्याय झाला आहे. बेस्ट कमिटीचे सदस्य, बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी कर्मचार्‍यांचे भत्ते बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 15 नोव्हेंबर रोजी बेस्ट कमिटीच्या बैठकीत कामगारांना मिळणारे विविध भत्ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेस्ट कर्मचार्‍यांना यापूर्वी मिळणारा वैद्यकीय भत्ता, वह्या-पुस्तके भत्ता, शिष्यवृत्ती योजना, उपहारगृह अर्थसहाय्य, नैमित्तिक रजा रोखीकरण, प्रोत्साहन भत्ता, सेवा सातत्य योजना यापुढे त्यांना मिळणार नाहीत. बेस्ट वर्कर्स युनियननेदेखील या निर्णयाला मान्यता दिली आहे.
बेस्ट उपक्रमामध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात युनियन सभासद नोंदणी केली जाते. 31 डिसेंबरला ही सभासद नोंदणी पूर्ण झाली की, मान्यताप्राप्त वर्कर्स युनियन आणि सत्ताधारी बेस्ट कामगार सेना मिळून कामगारांना मिळणारा महागाई भत्ता गोठवणार आहेत. एलटीए, अतिकालीन आणि अर्थसहाय्य भत्तादेखील बंद करतील अशी भीती कामगारांत पसरली आहे. बेस्टला होत असलेल्या आर्थिक तोट्यास कामगार जबाबदार नाहीत. तरीही कामगारांना पगारात मिळणारे विविध भत्ते बंद करून कमिटीने आपले नुकसान केले आहे, अशी भावना बेस्ट कर्मचार्‍यांमध्ये व्यक्त होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More
post-image
देश

डॉक्टरांवर हल्ला झालेल्या इंदुरमध्ये सापडले १० कोरोना रुग्ण

इंदूर – मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये कोरोनाचे नवे १० रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे एक पथक या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोना संक्रमणापासून आदिवासी पट्टा सुरक्षित

जळगाव – राज्याच्या विविध भागात कोरोनाच्या संक्रमण प्रक्रियेने थैमान घातले असताना जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी पट्टा मात्र सध्या तरी कोरोना संक्रमणापासून सुरक्षित...
Read More