बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार 30 मार्चला होणार! कर्मचार्‍यांत संताप – eNavakal
News मुंबई

बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार 30 मार्चला होणार! कर्मचार्‍यांत संताप

मुंबई- बेस्ट उपक्रम तोट्यात असून कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी आर्थिक चणचण भासत असल्याचे सांगत काल प्रशासनाने यंदाचा पगार मार्च अखेरपर्यंत देण्याची परवानगी घेण्यासाठी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. आज औद्योगिक न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला फेब्रुवारी महिन्याचा पगार मार्च महिन्याच्या 30 तारखेला आणि पुढील महिन्यापासून कर्मचार्‍यांचा पगार 20 तारखेला देण्यास अनुमती दिली आहे. यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून बेस्ट कर्मचार्‍यांच्या पगाराचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. राबराब राबून बेस्ट कर्मचार्‍यांना देण्यात येणारा पगारही वेळेत मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न कर्मचार्‍यांसमोर उभा ठाकला आहे. यासाठी बेस्ट कर्मचारी संपावरही गेले होते. मात्र प्रशासनाने केवळ आश्वासनांखेरीच काहीच ठोस पावले उचलली नाहीत. काल बेस्ट प्रशासनाने बेस्ट उपक्रम तोट्यात जात असून इतर खर्च व पगार देण्यासाठी आर्थिक चणचण भासत असल्याचे सांगत औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. प्रवासी संख्या घटल्यामुळे त्याचा परिणाम बेस्टच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा पगार 30 मार्चपर्यंत देण्यात येणार असून पुढील पगार दर महिन्याच्या 25 तारखेला देण्यात येईल, अशी भूमिका बेस्टकडून कोर्टात मांडण्यात आली. यावर आज शुक्रवारी सुनावणी झाली. प्रशासनाची बाजू ऐकून घेत औद्योगिक न्यायालयाने गेल्या महिन्याचा पगार मार्च महिन्याच्या 30 तारखेला आणि पुढील महिन्यापासून 20 तारखेपर्यंत कर्मचार्‍यांना पगार देण्यास प्रशासनाला अनुमती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More