बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार 15 तारखेला होणार, सदस्यांच्या बैठकीत महाव्यवस्थापकांचे आश्वासन – eNavakal
News मुंबई

बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार 15 तारखेला होणार, सदस्यांच्या बैठकीत महाव्यवस्थापकांचे आश्वासन

मुंबई – बेस्ट समिती सदस्यांच्या बैठकीची सुरूवातच आज सभा तहकुबीच्या सुचनेने झाली. सदस्य सुनिल गणाचार्य यांनी बेस्ट कामगारांचे पगार दिलेल्या तारखेला न झाल्याने सभा तहकुबीची सुचना मांडली होती. त्यांच्या या सुचने सर्वच समिती सदस्यांनी पाठिंबा दिला. अखेर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार 15 तारखेला होणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सभा तहकुबीचा प्रस्ताव गणाचार्य यांनी मागे घेतला.
कुलाबा येथील बेस्ट भवन येथे समिती सदस्यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना सुनिल गणाचार्य यांनी सभा तहकुबीची सुचना मांडली. बेस्टच्या कर्मचार्‍यांना दहा तारीख उलटून गेली तरी पगार मिळालेला नाही. बेस्टमध्ये 1 तारखेला पगार व्हायचा. आता तो 20 तारखेनंतर होतो. महापालिकेने आपल्याला कार्यक्रम आखून दिले होते. आपण ते राबविले. सभाही घेतल्या. नामंजुर झालेला प्रस्ताव आपल्याला मंजुर करून घ्यावा लागला ही शोकांतिका असल्याचे गणाचार्य म्हणाले. मिलेक्ट्रीत जसे काम केले जाते तसे डोळ्यात तेल टाकून आपले कामगार काम करतात. मनपा आयुक्तांनी गेले वर्षभर बेस्टला तालावर नाचविले आहे.मनपात बेस्टचा अर्थसंकल्प तुटीचा असल्याचे सांगत नामंजुर केला. बजेटमध्येसुध्दा बेस्टसाठी काही नाही. ज्या साडेचारशे खाजगी बसेस घेतल्या आहेत त्याविरोधात युनियन न्यायालयात गेली आहे. त्यवेळी आयुक्तांनी बेस्टशी आमचा संबंध नसल्याचे कोर्टात अ‍ॅफिडेव्हिड केले आहे. महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या कर्मचार्‍यांचा पगार दहा तारखेला व्हावा अशी घोषणा करावी अशी मागणीही गणाचार्य यांनी केली. तसेच भविष्यात कर्मचार्‍यांच्या पगारासाठी काय उपाययोजना केल्यात त्याबाबतही खुलासा करण्याची मागणी केली. गणाचार्य यांच्या सभा तहकुबीच्या मागणीला सर्वच समिती सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी कर्मचार्‍यांत नैराश्यपुर्ण परिस्थिती नसल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात 15 तारखेला पगार दिला गेलेला. यंदाचा पगारही कर्मचार्‍यांना 15 तारखेपर्यंत देण्यात येईल असे आश्वासन बैठकीत दिले. महाव्यवस्थापकांच्या आश्वासनानंतर सभा तहकुबी मागे घेण्यात आली.
त्यानंतर अनेक विषय यशासभेत चर्चेला आले. बेस्ट उपक्रमाकरीता इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिमची अंमलबजावणी करण्याकरीता मॅनेज्ड सर्व्हिस प्रोव्हायडरची नेमणुक करणे ही प्रस्ताव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. तसेच मार्ग प्रकाश स्तंभावर बसविण्यात आलेल्या ब्रॅकेटवर संचमांडणी केलेल्या विद्यमान एचपीएसव्ही लॅन्टर्सचे भाग सुटे करण्याचा समावेश असलेल्या एलईडी इंटिग्रल लॅन्टर्सची संचमांडणी करून ते कार्यान्वित करणे हा प्रस्तावही मंजुर करण्यात आला. ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड सर्व्हिसेस लि. या व्यवसाय संस्थेला दिलेला कंत्राट कालावधी विस्तार करण्याबाबतही मंजुरी देण्यात आली.
याबैठकीला अध्यक्ष अनिल कोकीळ, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, सदस्य सुनिल गणाचार्य, सुहास सामंत, रवी राजा, हर्षद कारकर, अनिल पाटणकर, राजेश कुसळे, सरिता पाटील, रत्ना महाले, भुषण पाटील, अमित शहा, श्रीकांत कवठणकर, दत्ता नरवणकर उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More