‘बेस्ट’पाठोपाठ एसटी कामगार आंदोलनाच्या तयारीत – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘बेस्ट’पाठोपाठ एसटी कामगार आंदोलनाच्या तयारीत

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या आठ दिवसांपासून बेस्ट कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच आता ग्रामीण भागाची जीवन वाहिनी समजल्या जाणार्‍या एसटी कर्मचार्‍यांनीही संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचार्‍यांना जी रक्कम मंजुर केली त्या वेतन करारावर सरकारने स्वाक्षरीच केली नसल्याचा आरोप एसटी संघटनांकडून करण्यात आला आहे. मान्य केलेल्या 4,849 कोटींचे वाटप पूर्ण न झाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशाराही एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

कामगारांना किमान 32 टक्के ते 48 टक्के वेतन वाढ मिळेल असे सरकारने जाहीर केले होते. मात्र त्यानुसार वेतन मिळत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी अनेकदा संप केला. ऐन दिवाळीच्या तोंडावरही एसटी कर्मचार्‍यांनी संप केला होता. यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचार्‍यांसाठी वेतनवाढीची घोषणा केली. पण या वेतनवाढीचा लाभ अजूनही मिळाला नसल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More