बेस्टच्या उत्पन्नात घट – eNavakal
News मुंबई

बेस्टच्या उत्पन्नात घट

मुंबई – बेस्टने साध्या बसचे किमान दर पाच रुपये तर एसी बसचे दर सहा रुपये केल्याने भाडेकपात केल्यानंतर पहिल्याच दिवशी तिकीट विक्री पाच लाखांनी वाढली असून प्रवासी संख्या 29 लाखांपर्यंत गेली आहे. उत्पन्नात मात्र 66 लाख 98 हजार 563 रुपयांची तूट आली आहे. बेस्टच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात पाच लाख प्रवासी संख्या वाढली आहे. बेस्टने मंगळवार, 9 जुलैपासून किमान तिकीट पाच रुपये केल्याने त्याचे प्रचंड स्वागत होत आहे.
बेस्टचा प्रवास स्वस्त होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 8 जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार बेस्टच्या 27 आगारांमधील माहितीनुसार एकूण 17 लाख 15 हजार 440 तिकिटांची विक्री होऊन त्याद्वारे बेस्टच्या तिजोरीत 2 कोटी 12 लाख 33 हजार 260 रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते, तर भाडेकपात झाल्याच्या पहिल्याच दिवशी तिकीट विक्रीत वाढ होऊन 22 लाख 18 हजार 253 तिकिटे संपली, तर उत्पन्न मात्र 1 कोटी 45 लाख 34 हजार 697 रुपये इतके कमी झाले आहे.  म्हणजेच भाडेकपातीनंतर तिकीट विक्रीत 5 लाख 2 हजार 813 ने वाढ झाली आहे, तर उत्पन्नात 66 लाख 98 हजार 563 ने घट झाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More