बेस्टचा संप सुरूच राहणार; कर्मचाऱ्यांना नोटीस – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्टचा संप सुरूच राहणार; कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई – आज बेस्ट बस संपाच्या दुसर्‍या दिवशीही कोणताच तोडगा निघाला नाही. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने काल संपातून माघार घेतली आणि आपल्या 11 हजार सभासदांना गाड्या बाहेर काढण्यास सांगितले. मात्र शिवसेनेवर पूर्ण अविश्वास दाखवीत त्यांच्या युनियनच्या एकाही सभासद कर्मचार्‍याने बस बाहेर काढली नाही. यामुळे बस सेवा पूर्ण ठप्प राहिली.

परिवहन मंत्री शिवसेनेेचे दिवाकर रावते यांच्या आदेशाने अखेर मुंबईत ठाणे, पनवेल, कुर्ला, परळ, मुंबई सेंट्रल, सीसीएमटी, कल्याण या मार्गांवर एसटी उतरविण्यात आल्या. मात्र 40 एसटी पुरेशा ठरल्या नाहीत. दरम्यान, शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेला कोणतीही मान्यता नसताना बेस्ट प्रशासनाने त्यांना सकाळी 10 वाजता चर्चेला बोलावले. यावेळी काही प्रतिनिधी चर्चेला गेले ज्यातून मार्ग निघाला नाही. त्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत हे महाव्यवस्थापकांना भेटण्यास आले, परंतु तरीही मार्ग निघाला नाही. तिकडे पालिकेच्या स्थायी समितीत हा विषय निघाल्यावर बैठक तहकूब करा ही विरोधकांची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फेटाळली. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने स्थायी समितीच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले.

शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेला बस काढण्यात आलेले अपयश, एसटीची तुटपुंजी संख्या आणि चर्चेतील अपयश यामुळे अगतिक झालेल्या बेस्ट प्रशासनाने आपल्याच कामगारांना छळण्यास सुरुवात केली. भोईवाडा व इतर वसाहतीत राहणार्‍या बेस्ट कर्मचार्‍यांना निवासस्थान खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. हा संप बेकायदेशीर आहे, असा निर्णय कोर्टाने दिला असून सरकारने मेस्मा लावला असतानाही कामावर गैरहजर राहिल्याने आपण निवासस्थान खाली करावे, असे नोटिशीत नमूद केले होत. पोलीस संरक्षणात या नोटिसा बजावल्या जात असल्यान;े कर्मचारी कुटुंब संतापली आणि त्यांनी एकजूट दाखवीत नोटीस देणार्‍यांना हाकलून लावले. त्याचवेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर हे मनसे कार्यकर्त्यांसह पोहचले आणि त्यांनी भोईवाडा वसाहतीतील कर्मचारी कुटुंबांना पूर्ण सहकार्‍याचे आश्वासन देऊन दिलासा दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More