जारकीहोळी बंधूंच्या पुढाकाराने होणार ‘ऑपरेशन कमळ’ – eNavakal
देश राजकीय

जारकीहोळी बंधूंच्या पुढाकाराने होणार ‘ऑपरेशन कमळ’


बेळगाव- बेळगावच्या सतीश, रमेश व भालचंद्र या जारकीहोळी बंधूंचे जिल्ह्याच्याच नव्हे तर कर्नाटकाच्या राजकारणात मोठे प्रस्थ आहे. या बंधूंचे वैशिष्टय म्हणजे या तिघाही सख्ख्या बंधूंनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवले आहे. यापैकी सतीश व रमेश हे काँग्रेसमध्ये असून अनुक्रमे यमकनमर्डी व गोकाक मतदारसंघामधून निवडून आले आहेत. तर भालचंद्र हे आरभावी मतदारसंघामधून भाजपाकडून निवडून आले आहेत. या जारकीहोळी बंधूंचे राजकारण कायमच ‘सरशी तिथे पारशी’ या तत्वाला अनुसरून चालत आले आहे. आताही जे काँग्रेसचे आमदार रिसॉर्टमधून गायब झाले आहेत त्यामध्ये सतीश व रमेश या जारकीहोळी बंधूंचा समावेश आहे. आज सकाळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जवळजवळ सर्व आमदारांना कर्नाटक विधानभवनाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलनासाठी आणले होते. हे आंदोलन झाल्यानंतर या जारकीहोळी बंधूंनी तिथून पोबारा केल्याचे समजते. त्यावेळीपासून या दोघांचे फोन ‘नॉट रिचेबल’ आहेत. हे दोघे बंधू ‘ऑपरेशन कमळ’चा महत्त्वाचा भाग असून जारकीहोळी बंधूंसह जवळजवळ बारा काँग्रेसचे आमदार आपल्या आमदारकीचाच राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. एवढेच नव्हे तर ही जारकीहोळी दवयी इतर सावजे सुद्धा शोधणार असून येत्या काही दिवसांत आमदारांचे हे राजीनामासत्र सुरू होणार आहे. राजीनामा देऊन ते भाजपाच्या तिकिटावर त्यांच्यात्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. येडियुरप्पांच्या या ‘ऑपरेशन कमळ’ मिशनसाठी सतीश, रमेश आणि आधीच भाजपामध्ये असणाऱ्या भालचंद्र जारकीहोळी यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात जारकीहोळी बंधूंच्या या राजकीय नाटकबाजीवर कर्नाटकचेच नव्हे तर देशाचे लक्ष असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More