बेल्जियमला आता युरो स्पर्धा जिंकायचीय… – eNavakal
News क्रीडा

बेल्जियमला आता युरो स्पर्धा जिंकायचीय…

सेण्ट पीटर्सबर्ग – शेजारी देश फ्रान्सकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या बेल्जियमच्या आशांना सुरुंग लागला. मात्र गोल्डन जनरेशन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेल्जियमच्या या संघाने आता 2020 सालामध्ये होणार्‍या युरो फुटबॉल स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे.

युरो स्पर्धेत पात्र ठरून जेतेपद पटकावण्यासाठी जीवाचे रान करण्याचा चंग खेळाडूंसह प्रशिक्षक रोबर्टो मार्टीनेझ यांनी यावेळी बांधलाय. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये आपला ठसा उमटवण्यात बेल्जियमच्या खेळाडूंना यश लाभले. पण त्यांना अखेरचा विजयी पंच मारण्यात अपयश आले. आगामी वर्षांत त्यांना हे पुसून टाकायचे आहे. त्यामुळे युरो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More