बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडकणार मोर्चा – eNavakal
News मंत्रालय महाराष्ट्र

बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडकणार मोर्चा

नवी मुंबई- नोटबंदीनंतर देशातील आर्थिक स्थिती ढासळली, तरुणांच्या असलेल्या 41 लाख नोकर्‍या गेल्या आहेत. उद्योगाला कोणत्याही प्रकारची चालना मिळत नाही. स्पर्धा परीक्षा पास झालेला तरुण नैराश्याच्या गर्देत आहे. असे अनेक प्रश्न सोडविण्यात भाजपाला अपयश आले असल्याने याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नोव्हेंबर महिन्यात मंत्रालयावर लाखोंचा मोर्चा धडकणार आहे. याचीच पूर्वतयारी म्हणून राज्यात सद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून बैठकीचे सत्र सुरू आहे. येत्या निव़डणुकीत परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादीने सद्या एक बुथ 15 युथ हा नारा दिला आहे.
निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. विशेषतः गेल्या निवडणुकीत झालेली चूक सुधारत तरुण वर्ग आणि सोशल मीडियावर जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 बुथ 15 युथ असा नारा देण्यात आला आहे. यानुसार राज्यातील 94300 बुथवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या संपूर्ण बुथची रचना करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. एका बुथवर 15 पक्षाच्या युवक आघाडीची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. बुथ कार्यकर्ताच पक्षाचा मुख्य कणा असल्याने यावर विशेष भर देण्यात आला. यासाठी दोन महिने राज्यभर फिरून सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादीने युवक आघाडी बळकट करायला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 150 विधानसभा मतदारसंघ टार्गेट केले असल्याचे महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More