‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत जाहिरातबाजीवरच 56 टक्के खर्च – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत जाहिरातबाजीवरच 56 टक्के खर्च

नवी दिल्ली – केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारचा फसवेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. आपणच महिलांचे आणि मुलींचे तारणहार आहोत याचे ढोल बडविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना 22 जानेवारी 2015 पासून देशभर लागू केली. या योजनेसाठी केंद्र सरकारने 644 कोटी रुपये मंजूर केले. गेल्या चार वर्षांत त्यापैकी फक्त 159 कोटी रुपये या योजनेवर खर्च झाले. तर 354 कोटी नरेंद्र मोदींच्या टीव्ही चॅनल व वर्तमानपत्रातील जाहिरातींवर खर्च झाले.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा टक्का वाढावा, स्त्रीभ्रण हत्या थांबाव्यात आणि मुलीचा जन्म म्हणजे ओझे व गळ्याला फास, अशी जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना देशभर लागू करण्यात आली. मात्र या योजनेवर खर्च कमी व जाहिरातबाजीवर खर्च अव्वाच्या सव्वा, असा फसवेपणा आहे. केेंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांनीच लोकसभेत ही कबुली दिली आहे.

देशात एकूण 64 जिल्हे असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी याप्रमाणे 644 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. गेल्या चार वर्षांत देशातील 161 जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. मात्र ही योजना यशस्वी झाली नाही. त्यातील अंदमान-निकोबारसहीत 53 जिल्ह्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना फ्लॉप झाली. या जिल्ह्यांमध्ये पूर्वी स्त्री-पुरुषांचे प्रमाण घसरले. 2014 मध्ये 1000 पुरुषांमध्ये 1107 महिला होत्या. ते प्रमाण 2018 मध्ये 1000 पुरुषांमध्ये 976 स्त्रिया असे विषम बनले व या योजनेचा फज्जा उडाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More