बॅरेज धरणात बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू – eNavakal
News मुंबई

बॅरेज धरणात बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू

बदलापूर- बदलापुरातील बॅरेज धरणात बुडून एका चौदा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. विवेक दीक्षित असे बुडून मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो बदलापूर पश्;िचमेकडील बॅरेज रोड परिसरात राहत होता.
आज मंगळवारी विवेक मित्रांसह बॅरेज धरण परिसरात गेला होता. त्यावेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला संध्याकाळी सहाच्या सुमारास याबाबत माहिती मिळताच फायर ऑफिसर आर.बी.पाटील, फायरमन शैलेश जगताप, अमित गुरव, शंकर फुलोरे, महेश कांबळे, दीपक जाधव, चंद्रकांत तोस्कर, संदीप माने आदींच्या पथकाने घटनास्थळी बचाव साहित्यासह धाव घेतली. रबरी ट्यूबच्या साहाय्याने विवेकचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी धरणाच्या मध्यभागी विवेकचा मृतदेह आढळून आला. पाण्यात डुबकी मारून गळाच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी विवेकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More