बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भरतीसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन – eNavakal
उपक्रम महाराष्ट्र

बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भरतीसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मुरबाड – मुरबाड सारख्या ग्रामीण भागात तरुण वर्गाची नोकरीसाठी असणारी आस आणि त्यासाठी लागणारे विशेष मार्गदर्शन तरुण वर्गाला व्हावे यासाठी मुरबाड कुणबी समाज हॉलमध्ये रविवारचे औचित्य साधुन शिबिराचे आयोजन केले होते याचा मुरबाड तालुक्तयातील तरुणानी लाभ घेतला. येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भरतीच्या सुमारे १३८८ पदांच्या ऑनलाईन परीक्षासाठी युवा वर्गांनी मोठ्या संख्येने यश संपादन करावे या उद्देशाने राष्ट्रनिर्माण अकॅडमी तर्फे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात मुरबाड तसेच शहापूर भागातून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. या मोफत शिबीरात वक्त्यांकडून अनुभवी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम अशा थोर विचारवंतांची उदाहरणे उपस्थितांना मार्गदर्शनातुन देण्यात आले. याप्रसंगी मुंबईचे तज्ञ बृ. म. पालिकेचे निवृत्त सहाय्यक दक्षता अधिकारी मा. टी. डी. बांगर, सेंट्रल रेल्वेचे सिनियर मॅनेजर मा. एस. व्ही. कापरे, मुंबईचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक अनिल घुगे आणि प्राध्यापक देशपांडे सर यांनी उपस्थितींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच भालचंद्र गोडांबे सर, प्रमोद पोगेरे, विनायक खरेयांनी उपस्थितांना आपल्या भाषणातून संबोधित केले. तर या मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन मुरबाड नगर पंचायतचे नगराध्यक्ष मोहन सासे यांनी केले. या शिबिराचा चांगला फायदा उपस्थित होईल अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली. बेरोजगार तरुणांच्या हितार्थ या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करणारे कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे तात्या, राष्ट्रनिर्माण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय ठाकरे सर आणि सहकारी यांचे सर्वत्र तोंडकौतुक केले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरचाच विकास करतात

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौर्‍यात आहेत. आपल्या खास शैलीत पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेत्यावर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More