बुलेट ट्रेनला अहमदाबादमधील एक हजार शेतक-यांचा विरोध – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

बुलेट ट्रेनला अहमदाबादमधील एक हजार शेतक-यांचा विरोध

मुंबई -मोदींच्या म्ह्त्वाकाशी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता गुजरातमधील शेतकऱ्यांनीही विरोध केला आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाविरोधात जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाला या शेतकऱ्यांचा जोरदार विरोध आहे.

बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गावरील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी जमीन देण्याची आमची इच्छा नाही, असं या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. बुलेट ट्रेनसाठी सप्टेंबर २०१५ मध्ये भारत आणि जपानदरम्यान करार झाल्यानंतर भूसंपादन कायदा २०१३ कमकुवत करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसंच या प्रकल्पासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया भारत सरकारला स्वस्त दरात कर्ज देणाऱ्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजंन्सीच्या (जेआईसीए) दिशानिर्देशांच्याही विरुद्ध असल्याचा आरोप या शेतक-यांनी केला आहे.

मुख्य न्यायाधीश आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांच्या खंडपीठात जमीन अधिग्रहणास आव्हान देणाऱ्या ५ याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याशिवाय विरोध करणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल करुन केंद्राच्या या महत्वाकांक्षी १.१० लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे शेतकरी आकर्षित झाले असून आम्ही त्याचा विरोध करतो. असं शेतकऱ्यानी म्हंटल आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

आग्य्रात रस्त्याकडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले! ६ ठार

आग्रा – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले. त्यात ६ मजुरांचा...
Read More
post-image
देश

केंद्रीय गृह मंत्रालय ‘राजीव गांधी फाउंडेशन’सह 3 ट्रस्टची ईडीमार्फत करणार चौकशी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या राजीव गांधी फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टची...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

वाळूज एमआयडीसीतील बजाज कामगारांच्या वेतनात कपात

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज एमआयडीसीमधील बजाज कंपनीमध्ये २५०हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असताना बजाज व्यवस्थापनाने लॉकडाऊन काळात कामावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ५० टक्के वेतन...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश नारकर

आज मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश नारकर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ८ जुलै १९६५ रोजीचा. अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका व नाटकात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

भारतात २४ तासांत २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली...
Read More