बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी दुसरा आरोपी अटकेत – eNavakal
देश

बुलंदशहर हिंसाचारप्रकरणी दुसरा आरोपी अटकेत

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहर हिंसाचारप्रकरणी पोलीस निरिक्षकाला गोळी मारुन ठार करणाऱा आरोपी प्रशांत नट याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी रात्री उशीरा या पोलीस अधिकार्‍याच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातलेल्या कलुआ नामक व्यक्तीलाही अटक केली आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस कलुआकडे चौकशी करीत होते.

3 डिसेंबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंगरावठी भागात झालेल्या हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह स्थानिक तरुण सुमीत याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुबोधकुमारला गोळी मारणार्‍या प्रशांत नटसह 29 जणांना आजवर अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रशांत नटने पोलीस निरिक्षकाला आपणच गोळी घातल्याची कबूली दिली होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीत हे स्पष्ट झाले की, सुबोधकुमार यांना गोळी घालण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालण्यात आले होते. हा हल्ला करणार्‍या कलुआला पोलिसांनी सोमवारी रात्री साडे दहा वाजता ताब्यात घेतले, याची माहिती एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More