बीसीसीआयचा अजब कारभार निलंबित खेळाडूंची संघात निवड – eNavakal
क्रीडा देश

बीसीसीआयचा अजब कारभार निलंबित खेळाडूंची संघात निवड

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) आज अजब कारभार पाहायला मिळाला असून मंडळाने डोपिंगप्रकरणी निलंबित एका खेळाडूची दुलीप ट्रॉफीसाठी संघामध्ये निवड केल्याची गंभीर चूक केली. आपली चूक लक्षात येताच त्या खेळाडूच्या जागी दुसर्‍या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 17 ऑगस्टपासून 8 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी रात्री उशीरा अभिषेकच्या जागी अक्षय वाडकरची निवड केल्याची घोषणा केलीदुलीप ट्रॉफीसाठी निवड समितीने काल इंडिया-रेड, इंडिया ब्ल्यू, आणि इंडिया ग्रीन या तीन संघांची निवड केली. यादरम्यान इंडिया रेड संघात डोपिंगमध्ये दोषी आढळलेला यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक गुप्ता याची निवड केली होती. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान अभिषेक गुप्ता डोपिंगमध्ये दोषी आढळला होता आणि त्याच्यावर 8 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. 15 जानेवारीपासून त्याच्यावर बंदी घालण्यात आली असून 14 सप्टेंबर रोजी ही बंदी उठणार आहे. पण त्यापूर्वीच त्याची संघात निवड करण्यात आली होती. आता त्याच्याऐवजी विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज अक्षय वाडकर याची निवड करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More