बीडमधील डाळिंबाच्या बागा वाळल्या – eNavakal
News महाराष्ट्र

बीडमधील डाळिंबाच्या बागा वाळल्या

बीड – बारा वर्षांपूर्वी लागवड करून जोपासलेल्या डाळिंबाच्या दोनशे हेक्टर क्षेत्रातील बागा यावर्षीच्या दुष्काळाने वाळून गेल्याने उंदरी (ता. केज) येथील शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी व आंब्याच्या बागांची अशीच परिस्थिती झाली आहे.
उंदरी येथे 2008 पासून येथील शंभरावर शेतकर्‍यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड करण्यास सुरुवात केली. डाळिंबाच्या विक्रमी उत्पादनासाठी उंदरचे नाव महाराष्ट्रात झाले. त्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी
प्रोत्साहन दिले.
दुष्काळाने विहिरीसह बोअरवेल व शेततळ्यातील पाणी आटल्याने शेजारच्या शेतकर्‍यांकडून एक हजार रुपये तासाने पाणी घेतले. मात्र पाणी कमी पडल्याने केळीची बाग ऐन भरात वाळून गेली, असे उत्तम ठोंबरे यांनी सांगितले.
आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली. एक एकरात आंबा व शेवगा लावला. डाळिंबास कळी लागून फळ धरण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने डाळिंबासह आंबा व शेवगा वाळून गेला, अशी व्यथा मधुकर ठोंबरे यांनी मांडली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More