बिबट्याच्या तावडीतून आईने वाचवले चिमुरड्याला – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

बिबट्याच्या तावडीतून आईने वाचवले चिमुरड्याला

पुणे – महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय. इथं आपल्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी एक आई थेट बिबट्याशी भिडली. शेतात झोपलेल्या एका कुटुंबावर बिबट्यानं हल्ला केला. झोपलेल्या चिमुरड्याला आपल्या जबड्यात पकडत बिबट्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, या बिबट्याचा चिमुरड्याच्या आईनं प्राण पणाला लावून सामना केला. या आईच्या साहसाची चर्चा परिसरात केली जातेय. जुन्नर तालुक्यातील ढोलवाड गावात ही घटना घडलीय. सदर कुटुंबातील दाम्पत्य ऊस कामगार म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री उशिरा उसाच्या शेतानजिक असलेल्या झोपड्यात झोपलेले असताना बिबट्यानं 18 महिन्यांच्या चिमुरड्यावर झडप घातली. ज्ञानेश्वर असं या चिमुरड्याचं नाव आहे.  ‘आम्ही रात्री झोपलेलो असताना बिबट्यानं माझ्या मुलाला पकडून खेचून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. हालचालीमुळे मला आणि माझ्या पतीला जाग आली आणि आम्ही आमच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला’ असं या चिमुरड्याचीआई दीपाली यांनी म्हटलंय.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी फलकावर लिहिले अदानी चोर है! घोषणा दिल्या ‘सरकार चोर है’!

मुंबई – पश्चिम उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना दहा-दहा पट वीज बिले देणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला यापूर्वी निवेदन देऊनही ग्राहकांना भरमसाठ वीज बिले येतच आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

वेदगंगेला महापूर; ५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर – पाटगाव धरणक्षेत्रात होत असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. निपाणी-राधानगरी मार्गावर निढोरी येथे वेदगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने येथून...
Read More
post-image
मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात अधूनमधून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी सातही...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा तपासणी अहवाल आज मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मित्तल यांची काल रॅपिड टेस्ट...
Read More
post-image
मुंबई

जुहूमधील बिल्डरची घरासमोरच धारदार शस्त्राने वार करून हत्या

मुंबई – मुंबईतील पुनर्वसन प्रकल्पातून निर्माण झालेल्या वादातून जुहूमधील बिल्डर अब्दुल मुनाफ शेख (५५) यांची घरासमोरच धारदार शस्त्राने डोक्यावर, पोटावर आणि छातीवर वार करून...
Read More