बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून, घरच्या मंडळीपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबियांची आठवण येणे अगदीच सहाजिक आहे. आज पितृदिन असल्याने बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना एक सुंदर सरप्राईझ मिळणार आहे. अभिजीत केळकर, अभिजीत बिचुकले यांना त्यांच्या मुलांशी बोलण्याची संधी दिली. यावेळेस सगळेच सदस्य खूप भावूक झाले. अभिजीत केळकरच्या मुलांनी त्याच्यासाठी तेरा मुझसे है पेहेले का नाता कोइ हे सुंदर गाणं गायलं.

विणा आणि बिचुकलेमध्ये काल झालेला वाद आजही बघायला मिळणार आहे. विणाने पेढे खाण्यास नकार दिला आणि त्यामुळे अभिजीत बिचुकले त्यावर म्हणाले, हे तर मुंबईचे पेढे आहेत, सातारचा कंदी पेढा खाण्यासाठी औकात लागते आणि तिची नाहीये ती. त्यावर महेश मांजरेकर यांनी विचारले सातारचे पेढे खायला औकात का लागते? त्यावर बिचुकले म्हणाले अन्नाचा एवढा अपमान कोण करेल का? विणानेदेखील यावर विचारले चिकन आणि दोन पोळ्या का टाकून दिल्या? आता हा वाद कुठपर्यंत पोहचेल? हे कळेलच.

तसेच शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये बिचुकलेंनी केलेल्या शिवीगाळवर बोलताना महेश मांजरेकर यांनी सांगितले ‘इथे शिव्यांची स्पर्धा नको’ त्यावर सुरेखा पुणेकर यांनीदेखील त्यांचे मत मांडले. आता त्या काय म्हणाल्या? त्यांचे काय मत होते? हे प्रेक्षकांना आजच्या भागात कळेलच. तर चुगली बूथवर नेहाच्या चाहत्याने विणाविषयी चुगली केली आहे की, विणा नेहाला बेडूक म्हणाली. आता विणाचं यावर काय स्पष्टीकरण असेल हे जाणून घेण्यासाठी पाहा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवाहिनीवर.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More