बिग बॉस २ : आज रंगणार ‘एक डाव भुताचा’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : आज रंगणार ‘एक डाव भुताचा’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘एक डाव भुताचा’ हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. या कार्याचा परिणाम पुढील आठवड्याच्या कॅप्टनसीवर होणार आहे. कार्यात वेळोवेळी वाजणाऱ्या बझरनंतर भूत झालेला सदस्य जर सेफमध्ये जाऊ शकला नाही तर तो सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. आता कोण स्पर्धेत राहणार? कोण बाद होणार? हे पाहणे रंजक असणार आहे.

काल घरामध्ये KVR ग्रुपचे खटके उडतच होते. इतकी चर्चा या ग्रुपमध्ये कसली होते याबद्दल वैशाली, शिव आणि माधव यांच्यामध्ये बातचीत सुरु होती. तर किशोरीताईंनी सकाळी झालेल्या प्रकारामुळे कॅमेराकडे आपली खंत व्यक्त केली. माधवने किशोरी शहाणे यांना विचारले, ग्रुपमध्ये गैरसमज दूर झाले का? याबद्दल किशोरीताईंनी रुपालीला सांगितले. त्यावर रुपालीने संताप व्यक्त केला. ती म्हणाली, ‘आपल्या ग्रुपमध्ये काय होतंय, का भांडण होते याबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते पण आपण तेसे करत नाही. आपण कधीच जात नाही दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी. आपण कधीच दुसऱ्या ग्रुपमध्ये डोकावत नाही.’ त्यानंतर रुपालीने किशोरीताईंची माफी मागितली. तसेच माधवने किशोरीताईंना केलेल्या विचारपूसबद्दल रुपालीने वीणाला सांगितले, त्यावर ‘मी ग्रुपमध्ये नाहीये, मी वैयक्तिक खेळते आहे जे ग्रुपमध्ये आहेत त्यांनी बोलावे’, असे स्पष्ट उत्तर वीणाने दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More