बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंंवाद विवादआरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस यांनी विरोधी टीमला टास्कमध्ये हरविण्यासाठी सामदाम, दंडभेद याचा उपयोग चातुर्याने करायला सांगितलं आहे. तसेच टास्कमध्ये दिलेली ऑर्डर एकाच टीमने पूर्ण करायची आहे हेदेखील निक्षून सांगितले. हे सांगितल्याने काल परागने स्वत:लाच मॅनेजर बनवले आणि त्यामुळे दोन्ही टीममध्ये वादाची ठिणगी उडली. या टास्कदरम्यान मॅनेजरमध्ये झालेल्या डीलप्रमाणे विणाच्या टीमने परागच्या टीमला approve झालेले २ कपडे द्यायचे आहेत. परंतु विणाच्या टीमने यावर उत्तम योजना आखली आहे. टीम परागला सांगणार आहे आमच्या टीमचा मॅनेजर सुट्टीवर आहे आणि यावरूनच विणा आणि परागमध्ये वाद होणार आहे.

याच टास्कदरम्यान पुन्हा शिवविरुध्द नेहा हे दृश्य दिसणार आहे. ज्यामध्ये शिव साम, दाम, दंडभेद हे मोठ्या आवाजात बोलल्याने समोरच्या टीमची चिडचिड झाली आणि हेच होत असताना परागचा राग अनावर झाला आणि तो देखील शिवला टक्कर देत सामदाम, दंडभेद असे मोठ्या आवाजात बोलू लागला. परंतु यामुळे परागलाच त्याचा त्रास तर होणार नाही नाहे आजच्या भागामध्ये कळेल. या साप्ताहिक कार्यामध्ये कोणती टीम विजेती ठरेलहे जाणून घेण्यासाठी पाहा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर. 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More