बिग बॉस मराठी २ : शिवानी वीणाला जाब विचारणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिवानी वीणाला जाब विचारणार

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली सदस्य शिवानी सुर्वे हिची पुन्हा घरामध्ये एन्ट्री झाली. नेहा, माधव, अभिजीत तिला परत बघून खूप खुश झाले. तर मागच्या आठवड्यामध्ये वीणा आणि रुपालीची किशोरी शहाणे सोबतची वागणूक अत्यंत वाईट होती. संपूर्ण आठवडा ‘ताई तू बोलूच नकोस’ हेच वाक्य वीणाकडून ऐकायला मिळत होतं. किशोरी इतकं काहीच चुकीचं वागली नाही तरी रुपाली आणि वीणाने मिळून तिला टार्गेट केलं असं का? या गोष्टीवरून वीणा आणि रुपालीची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. तसेच किशोरी तू एकटी खेळ, कोणी बरोबर असो वा नसो काहीच फरक पडत नाही या घरात सगळेच एकमेकांवर अवलंबून असल्याचे बाहेर दिसत आहेत. तू एकटी खेळताना दिसशील त्यामुळे तुला काहीच गरज नाही यांच्यापुढे लोटांगण घालण्याची, असे म्हणून किशोरीताईंना पाठींबा दिला. तर आठवड्यातील वाईट खेळाडू म्हणून शिव आणि वीणाची नावे महेश मांजरेकर यांनी घेतली. शिवने खेळ सोडून दिला आहे, असे ते म्हणाले. तर उत्तम खेळाडू म्हणून नेहा आणि अभिजीतचे नाव घेतले. तसेच नेहा तू घाबरली आहेस का? असे देखील विचारले. त्यावर नेहाने नाही असे उत्तर दिले. हिनाला भाकरी मिळाली नाही या मुद्दयावरूनदेखील घरातील सगळ्यांचीच शाळा घेतली.

आजच्या भागामध्ये शिवानी वीणाला जाब विचारणार आहे. पराग आणि वीणा बोलत असताना पराग म्हणाला होता, ‘आता मी हिला नादी लावतो’ त्यावर द ग्रेट वीणा जगताप असे म्हणाल्या, ‘हा ती आहेच तशी, मग तशी म्हणजे कशी? या प्रश्नाचे मला उत्तर हवं आहे’, असे शिवानी म्हणाली. तर वीणाने त्यावर मला असे काहीही बोलल्याचे आठवत नाही. आता पाहूया यावर वीणा काय म्हणते आणि शिवानीचे त्यावर काय उत्तर असेल.

याचबरोबर घरामध्ये दोन खेळ खेळण्यात येणार आहेत. पहिल्या खेळात सदस्यांना काही गोष्टी दाखविण्यात येणार आहेत जसे खंजर, माचीस. आता पाहूया घरातील सदस्य कोणाला माचीस, खंजीर याची उपमा देतात. दुसरा गेम रंगणार आहे प्रश्न – उत्तराचा, ज्यामध्ये activity एरियामध्ये एक सदस्य जाईल त्याला एक प्रश्न विचारला जाईल त्याचे उत्तर आत बसलेला सदस्य देईल आणि बाहेर शिवानीदेखील देईल जर ती उत्तरे जुळली नाहीत तर आतल्या सदस्याच्या कानाखाली बसेल. आता कोणाची उत्तरे जुळतात आणि कोणत्या सदस्याच्या कानाखाली बसते, हे पाहणे रंजक असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More