बिग बॉस मराठी २ : शिवानीच्या शूज मागचे ‘शिल्पकार’ ऐकाल, तर चकित व्हाल – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

बिग बॉस मराठी २ : शिवानीच्या शूज मागचे ‘शिल्पकार’ ऐकाल, तर चकित व्हाल

मुंबई – ‘बिग बॉस मराठी २’मध्ये देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. आता अभिनेत्री आहे, म्हटल्यावर कोणत्यातरी महागड्या डिझाइनरकडूनच तिने हे सर्व डिझाइन केलेले असणार, असं अनेकांना वाटतं असेल. पण शिवानीच्या शूज मागचे शिल्पकार ऐकाल, तर चकित व्हाल.

शिवानीचे शूज डिझाइनर जरूर आहेत. पण कोणत्याही महागड्या डिझाइनरने ते डिझाइन केलेले नसून, ते दिव्यांग मुलांनी डिझाइन केलेले आहेत. ‘फिट मी अप एनजीओ’च्या मुलांनी डिझाइन केलेले हे शूज शिवानी बिग बॉसच्या घरात घालत आहे. दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ काम करते. ह्या संस्थेचा ‘फिट मी अप’ हा दिव्यांग मुलांना रोजगार मिळवण्यासाठी सुरू झालेला इनिशिएटिव्ह आहे.

फिट मी अपची निदेशक, प्रसन्नती अरोरा सांगते, मी आणि माझी मैत्रिण दिपशिखाने 2011ला दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ची सुरूवात केली. त्यांना सज्ञान झाल्यावर रोजगार मिळावा हे यामागचा उद्देश आहे आणि आम्हांला आनंद आहे की, शिवानी सुर्वेसारखे सेलिब्रिटीज आमच्या इनिशिएटिव्हला अशा पध्दतीने पाठिंबा देत आहेत.

 

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर शिवानी सुर्वे यासंदर्भात सांगताना म्हणाली, जरी ही मुलं दिव्यांग असली तरीही कोणत्याही पारंगत डिझाइनरप्रमाणे त्यांनी शूज डिझाइन केले आहेत. त्यामुळे मी त्यांनी डिझाइन केलेले तीन-चार शूज घेऊन बिगबॉसमध्ये चाललीय. त्यांच्यासाठी माझ्या परीने उचललेला हा खारीचाच वाटा म्हणा ना.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More