बिग बॉस मराठी २ : ‘मिसेस काटेकर’सह ‘हे’ आहेत सहभागी स्पर्धक – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

बिग बॉस मराठी २ : ‘मिसेस काटेकर’सह ‘हे’ आहेत सहभागी स्पर्धक

मुंबई – ‘बिग बॉस मराठी’चा पहिला सीझन गाजल्यानंतर ‘बिग बॉस मराठी २’ मध्ये कोण-कोणते कलाकर असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काल ‘बिग बॉस मराठी २’चा ग्रँड प्रिमिअर पार पडला असून बिग बॉसच्या घरात कोणकोणते सेलिब्रिटी जाणार यावरून पडदा उचलण्यात आला आहे. ‘तात्या सरपंच’ अर्थात विनोदी अभिनेते दिगंबर नाईक आणि ‘सेक्रेड गेम्स’ मधली मिसेस काटेकर म्हणजेच नेहा शितोळे यांच्यासह १५ स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी दमदार परफॉर्मन्स करत बिग बॉसच्या घरात पहिलं पाऊल टाकलं. त्यांना त्यांचा ७ हा लकी नंबर मिळाला. त्यानंतर दिगंबर नाईक आणि नेहा शितोळे यांनी घरात एन्ट्री केली. बिग बॉसच्या ग्रँड स्टेजवर दिगंबर नाईक यांनी गाऱ्हाणंही घातलं. यानंतर नेता अभिजित बिचुकले यांनी प्रवेश केला. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या वीणा जगतापने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडेने पिंगा ग पोरी पिंगा हे गाणे सादर करत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. यानंतर देवयानी फेम शिवानी सुर्वेन घरात एन्ट्री घेतली. शिव ठाकरे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी, शेफ पराग कान्हेरे, मैथिली जावकर, माधव देवचक्के, रुपाली भोसले आणि अभिनेता अभिजित केळकर यांनी आपले जबरदस्त परफॉर्मन्स देत बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More