बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन ठेवले आहे. बझर वाजल्यानंतर टीममधील सदस्य सिंहासनावर मुद्रा हातात घेऊन बसेल. त्याच्यासोबत टीममधील एक सदस्य त्याच्या संरक्षणासाठी असेल. दुसऱ्या टीममधील सदस्याने बझर वाजण्याच्या आत मुद्रा धरून बसलेल्या सदस्याला लवकरात लवकर सिंहासनावरून हटवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सदस्य हा त्रास सहन करू शकतीलकोणता सदस्य अधिक वेळ सिंहासनावर टिकून राहीलहे बघणे रंजक असणार आहे.

‘हिशोब पाप-पुण्याचा’

बिग बॉस मराठीच्या घरात काल ‘हिशोब पाप-पुण्याचा’ हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या कार्यात इतर सदस्यांना स्वर्गात पाठवून सेफ करायचे की नरकात पाठवून नॉमिनेट करायचे याचा निर्णय कार्यप्रमुख शिव ठाकरे आणि त्याचे दोन सल्लागार माधव आणि नेहाला करायचा होता. परंतु अंतिम निर्णय हा कार्यप्रमुखचाच होता. कालच्या टास्कमध्ये रुपाली–वैशाली, अभिजीत केळकर-परागहीना–वीणा यांच्यामध्ये बरेच वाद झाले. तर टास्कदरम्यान सुरेखाताई–वीणामध्येदेखील भांडण झाले. कालच्या टास्कमध्ये वीणा जगताप, पराग कान्हेरे, हीना पांचाळ, किशोरी शहाणे-वीज आणि रुपाली भोसले घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले.

कोणती टीम टिकेल तोच टिकेल हे कार्य जिंकेलया आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडेल? प्रेक्षकांची मते कोणाला वाचवतीलहे जाणून घेण्यासाठी पाहा बिग बॉस मराठी सीजन २ रात्री साडे नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर. 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More