बिग बॉस मराठी २ : घरात आज दिले जाणार प्रेमाचे धडे – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : घरात आज दिले जाणार प्रेमाचे धडे

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात रंगत आहे शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य. आज देखील बिग बॉसची शाळा भरणार आहे. या टास्कसाठी बिग बॉस यांनी टीम नेमून दिल्या असून त्यानुसार शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सदस्यांना त्यांना नेमून दिलेले विषय विद्यार्थांना शिकवायचे आहेत. पराग कान्हेरे याला प्रेमशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे आणि म्हणूनच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिक देऊन. यासाठी परागने रुपाली भोसलेसोबत डान्स सादर केला. ज्यावरून घरातील सदस्य पराग आणि रूपालीला बरेच चिडवताना दिसणार आहेत. ‘तेरे से मॅरेज करने को मै’ या गाण्यावर पराग आणि रुपालीने डान्स केला आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि घराबाहेर रुपाली आणि परागबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत. त्यात किती सत्य आहे हे त्यांनाच ठाऊक पण हा डान्स आणि प्रेमशास्त्राचा क्लास घरातील सदस्यांनी बराच एन्जॉय केला आणि तो आज प्रेक्षकदेखील करतील.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल काय घडलं?

विणा, किशोरीपराग आणि रुपाली यांचा ग्रुप बराच चर्चेत आला आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या एकीबद्दल घरातील सदस्यदेखील चर्चा करताना दिसतात. ग्रुप तयार झाला की, प्रत्येक ग्रुपचे काही कोड वर्ड, साईन असतात. काल यांच्या ग्रुपने युनिटी, लव्ह आणि रिसपेक्ट यांच्यासाठी साईन तयार केल्या ज्यांचा वापर ते टास्क दरम्यान अथवा घरामध्ये करताना दिसतीलच. तर शिवानी आणि किशोरी शहाणेमध्ये झालेला वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला पण आता किशोरी शहाणे यांनी सगळे विसरून शिवानीची माफी मागितली आहे. जे तिने नेहालादेखील सांगितले. तर नेहा आणि शिवमध्येदेखील बराच वाद झाला. तसेच कालपासून शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये किशोरी यांना मुख्याध्यापिका केले असून रूपालीला गृहविज्ञान, वीणाला वादविवाद, सुरेखा यांना नृत्यकला आणि शिवला मराठी विषयाचे शिक्षक केले असून उर्वरित सदस्य विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. 

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी पाहा बिग बॉस मराठी २ रात्री साडेनऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर. 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More