बिग बॉस मराठी २ : ‘एक डाव भुताचा’मध्ये कोण बाजी मारणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘एक डाव भुताचा’मध्ये कोण बाजी मारणार

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर ‘एक डाव भुताचा’ हे साप्ताहिक कार्य सोपवले. या कार्यात टीम A मध्ये रुपाली, नेहा, हिना आणि माधव तर टीम B मध्ये वैशाली, शिव, वीणा, अभिजीत केळकर आहेत आणि किशोरी शहाणे या कार्याच्या संचालिका आहेत. भूत असलेल्या टीमने काळे कपडे घालायचे आहेत आणि शिकारी असलेल्या टीमने पांढरे कपडे. काल वीणा, अभिजीत आणि शिव सेफमध्ये गेले तर वैशाली सेफमध्ये न जाऊ शकल्याने ती कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडली. यावेळी नेहा आणि हिनाला काही करून कॅप्टन नाही होऊ द्यायचे, अशी चर्चा अभिजीत, वीणा आणि शिवमध्ये झाली. त्यामुळे आज काय होणार. टीम B मधील कोणता सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर जाणार? कोण जिंकणार? टीम A च्या बाहुल्या कुठे कुठे लपवल्या जाणार? हे बघणे रंजक असणार आहे.

आजच्या भागात अभिजीत, वैशाली आणि शिव यांच्यामध्ये टीम A च्या बाहुल्या कुठे कुठे लपवता येऊ शकतील याबद्दल गहन चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये अभिजीतचे म्हणणे आहे, ‘मी कालच विचार करून ठेवला आहे त्यांच्या बाहुल्या आपण कुठे कुठे लपवू शकतो. अभिजीतने हेच शिव आणि वैशालीला सांगितले कॅमेराच्या वर, तुळशीच्या खाली खड्डा आहे तिथे लपवू शकतो. आता बघूया यांनी लपवलेल्या बाहुल्या टीम A शोधू शकतील का?

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More