मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसीसाठी उमेदवार निवडण्याचे कार्य बिग बॉस यांनी काल सदस्यांवर सोपावले होते. या कार्यात सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद झाले, मतभेद झाले आणि अखेर या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी दोन उमेदवार मिळाले. या आठवड्यात ‘म्हातारीचा बूट’ हे कॅप्टनसी कार्य शिव आणि किशोरी शहाणेमध्ये रंगणार आहे. आता हा टास्क सदस्य कसा पार पाडतील आणि घराचा कॅप्टन होण्याचा मान कोण पटकावणार हे बघणे रंजक असणार आहे.
या टास्कदरम्यान शिव आणि आरोहचा वाद झाला आहे. आरोह म्हणाला, ‘काही ताकद नाहीये त्याच्यामध्ये फुसका आहे तो.’ त्यावर वीणा म्हणाली, ‘दादागिरी नाही करायची.’ मग वीणा आणि आरोहमध्ये भांडण सुरू झालं. आरोहला सगळ्यांपासून प्रॉब्लेम आहे, असे वीणाने हीनाला म्हटले. याचा जाब आरोहने वीणाला विचारल्यानंतर ‘तुला अनावश्यक गोष्टीचा त्रास होतो’, असे स्पष्टीकरण देत तिने आपण असे बोललो असल्याचे कबूल केले. त्यावर आरोह म्हणाला, ‘तू कोण ठरवणारी कोणती गोष्ट आवश्यक आहे आहे कोणती नाही. त्याने असे बोलल्यानंतर वाद वाढत गेला आहे.’ आता पुढे काय होईल ते आजच्या भागात कळेलच.