बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘तहानलेला कावळा’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘तहानलेला कावळा’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर एक कार्य सोपवले ज्यानुसार त्यांना टॉप २ आणि बॉटम २ सदस्यांची नावे द्यायची होती ज्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार होती. सदस्यांनी टॉप २ मधील फक्त एकाच सदस्याचे नाव दिले ते म्हणजे अभिजीत केळकर दुसरे नाव बिग बॉस यांनीच सांगितले जे सदस्यांनीच बॉटम सदस्याच्या चर्चेत घेतले होते आरोह वेलणकर. आरोहच्या टीममध्ये शिवानी, अभिजीत बिचुकले, वीणा आणि नेहा असणार आहेत तर अभिजीत केळकरच्या टीममध्ये किशोरी, रूपाली, शिव आणि हीना असणार आहेत. आज घरात ‘तहानलेला कावळा’ हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. 

रांझणातील तळाला गेलेले पाणी वर यावे यासाठी शक्तीऐवजी युक्ती वापरून कावळ्याने खडे टाकून पाणी प्यायले होते. कॅप्टन्सीची संधी आज तळाला गेलेल्या पाण्यासारखी आहे. जी सदस्यांना खडे टाकून  मिळवायची आहे. यासाठी बिग बॉस सदस्यांवर हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहेत. बिग बॉस यांनी या कार्यासंबंधातले काही नियम आखून दिले आहेत. मात्र शिव आणि विणाकडून महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन होणार आहे. बिग बॉस सगळ्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्यादरम्यान दिलेल्या सामग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे. पण शिव आणि विणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळे त्यांना शिक्षा दिली असून त्यांनी रांझणातील खड्यांव्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूलमध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत. 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
देश

गोव्यात मासेविक्री करण्यास परवानगी

पणजी – लॉकडाऊनमुळे गोव्यात एक महिनाभर मासेविक्री बंद करण्यात आली होती. मात्र आता संपूर्ण राज्यात गोवा सरकारने मासेविक्री करण्यास परवानगी दिली आहे. मासेविक्री करताना...
Read More