बिग बॉस मराठी : मेघा-रेशमने प्रतिस्पर्धकांना दिली ‘मिरचीची धुरी’ – eNavakal
मनोरंजन मुंबई व्हिडीओ

बिग बॉस मराठी : मेघा-रेशमने प्रतिस्पर्धकांना दिली ‘मिरचीची धुरी’

मुंबई –  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या प्रवासामध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज-गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर आज बॉक्स–अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे हे बघणे रंजक असणार आहे. ज्यामध्ये मेघा, आस्ताद आणि रेशम यांना मिळून बॉक्स मध्ये असलेले शर्मिष्ठा, पुष्कर, स्मिता आणि सई यांना त्या बॉक्स मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तसेच काल झालेल्या चर्चेवरून आणि वादावरून शर्मिष्ठा आणि मेघा मध्ये आज बरीच चर्चा होणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले बिग बॉस यांचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “टिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. याचाच अर्थ ज्याला हे टिकीट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे. काल मेघा “टिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद झाली. आज टास्कमध्ये काय होणार ? “टिकीट टू फिनाले” या रेसमधून कोण बाद होणार कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार तसेच आज कोणते अतिथी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार हे बघायला रंजक ठरणार आहे.

बिग बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. हे बघितल्यानंतर घरातील सदस्य मेघाच्या विरोधात गेले आणि सगळ्यांनीच तिला जाब विचारायला सुरुवात केली. रेशमने मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न केला किती जे काही पर्सनल तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसेच सईने शर्मिष्ठाला आणि आस्तादने मेघाला जाब विचारला. पुष्कर आणि सई मेघावर काल बरेच नाराज झालेले दिसून आले. मेघा जे काही पुष्कर बद्दल बोलली त्यावरून पुष्कर आणि सईने देखील मेघाचे नाव “टिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद होण्यासाठी घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

‘त्या’महिलेचे घरकूल हरवले! प्रधानमंत्री योजनेचा ‘खेळ मांडला’

शहापूर, – प्रधानमंत्री घरकूल योजनेचे 2016/17 या कालावधीतील एकही मस्टर ऑनलाईन भरून सबमिशन न केल्यामुळे नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील 14 लाभार्थ्यांना प्रत्येकी 18 हजार नव्वद रुपयांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसतिगृहांच्या तक्रारींवर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा आरपीआयचा इशारा

क र्जत,- तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आरपीआयच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. वसतिगृहांच्या कार्यपद्धतीत आठ दिवसात सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे

अमृतसर – रावण दहनापूर्वीचा खळबळजनक व्हिडीओ व्हारल

अमृतसर – अमृतसरमध्ये घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये ६१ लोकांचा जीव गेला. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच एक खळबळ जनक वृत्त समोर येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

फटाक्याच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

उस्मानाबाद -उस्त्मानाबादमधील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. दरम्यान, घटनेवेळी कारखान्यात कोणीही नसल्याने मोठी जिवितहानी टळली. वाशी तालुक्यातील तेरखेडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीजवर ८ गडी राखून भारताचा दणदणीत विजय

गुवाहाटी- पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्ध आज येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी...
Read More