बिग बॉस मराठी – मेघाच्या तिखट शब्दांनी पुष्करला आलं रडू… – eNavakal
मनोरंजन मुंबई

बिग बॉस मराठी – मेघाच्या तिखट शब्दांनी पुष्करला आलं रडू…

मुंबई – बिग बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. ज्यामध्ये स्मिताला रेशम आणि आस्ताद मधील संभाषण दाखविण्यात येणार आहे. पुष्करसई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. हे बघितल्यानंतर सदस्यांमध्ये वाद होणार हे नक्की. रेशम मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कीती जे काही पर्सनल तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसेच सई शर्मिष्ठाला आणि आस्ताद मेघाला जाब विचारणार आहे. यानंतर घरामध्ये नाती बदलतील ? मेघा, सई आणि पुष्करच्या मैत्री मध्ये पुन्हा फुट पडेल हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळलेच.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना येऊन आता जवळ जवळ ९० दिवस पूर्ण होतील. या प्रवासामध्ये स्पर्धकांमध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज–गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर आज बॉक्स–अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे हे बघणे रंजक असणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस सदस्यांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे कार्य देत असतात. काल देखील बिग बॉस यांनी सदस्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य सोपावले आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “टिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. याचाच अर्थ ज्याला हे टिकीट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे. तसेच याच टास्कमध्ये अजून एक कार्य देण्यात आले. ते म्हणजे सदस्यांना एकमेकांचे प्रतिनिधित्व करायचे होते. सदस्यांना बाबागाडी देण्यात आली आणि ज्या सदस्याची बाबागाडी पार्क होऊ शकणार नाही तो “टिकीट टू फिनाले” या रेस मधून आउट होणार. काल आस्तादची बाबागाडी पुष्कर पार्क करण्यात असफल ठरला त्यामुळे आस्ताद या रेसमधून बाद झाला. तसेच बिग बॉस यांनी सदस्यांना अजून एक टास्क दिला ज्यामध्ये सदस्यांना ज्यांना नॉमिनेट करायचे आहे त्यांच्या चेहऱ्यावर फोम लावायचे आहे असे सांगितले. ज्यामध्ये सईमेघा, शर्मिष्ठा आणि पुष्करने रेशमला नॉमिनेट करून “टिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद केले. अश्याप्रकारे आस्ताद आणि रेशम या टास्कमधून काल बाद झाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More