बिग बॉस की गाड़ी होगी सितारा स्पेशल! टीझर रिलीज – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस की गाड़ी होगी सितारा स्पेशल! टीझर रिलीज

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो अर्थात ‘बिग बॉस’ मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, बंगाली अशा विविध भाषांमध्ये प्रसारित होतो. मात्र बिग बॉस हिंदीचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग सलमान खान करतो. त्यामुळे बिग बॉस हिंदी पाहण्याकडे चाहत्यांचा अधिक कल असतो. लवकरचा या शोचा १३ वा सीजन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी फक्त कलाकार असणार, असे सलमानने स्वत: या टीझरमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच कलाकारांना चार आठवड्यात फायनलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे पण खरी शर्यत त्यानंतर सुरू होईल, असेही सलमानने म्हटले आहे. परंतु हा सीजन कधी सुरू होणार, कोण-कोण स्पर्धक असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कलर्स टीव्हीने प्रदर्शित केलेल्या या टीझरमध्ये सलमान खान स्टेशन मास्तरच्या रुपात दिसत आहे. सलमान खान हा एका सुपरफास्ट ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. त्यामुळे या ट्रेनच्या वेगावरुन यंदाच्या बिग बॉसमध्ये अनेक ट्विस्ट येणार, हे नक्की.

दरम्यान, बिग बॉसचा तेरावा सीजन २९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून चंकी पांडे, राजपाल यादव, करण पटेल, शिविन नारंग, करण वोहरा, टीना दत्ता, देबलीना, अंकिता लोखंडे हे स्पर्धक असतील, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

लढा लवकर संपवूया, संशयितांनो पुढे या- अजित पवार

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. रोज तिप्पटीने बदलणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण करतेय. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा संपवायचा असेल तर संशयितांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More