बास्केटबॉलचा जादूगार -‘कोबी ब्रायंट’! – eNavakal
ट्रेंडिंग

बास्केटबॉलचा जादूगार -‘कोबी ब्रायंट’!

आज टीव्हीवरील आणि सोशल मीडियावरील एका बातमीने बास्केटबॉलप्रेमींच्या पाया खालची जमीन सटकली. ती बातमी होती दिग्गज बास्केटबॉल खेळाडू kobe bryant कोबी ब्रायंट याच्या निधनाची. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत कोबी ब्रायंट आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्रायंट याच्या निधनावर भारतातील क्रीडा आणि सिनेसृष्टी क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. दिग्गज बास्केटबॉलपटू खेळाडूंच्या यादीत कोबी ब्रायंट याचं नाव आघाडीवर होतं. तर कोबी ब्रायंटच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर १० पैकी सर्व ट्रेंड हे त्याच्याच संदर्भातील होते. यावरून कोबी ब्रायंटची जागतिक स्तरावर असलेली लोकप्रियता लक्षात आलीच असेल. काळाच्या पडद्याआड गेलेल्या कोबी ब्रायंट याच्या आजवरच्या प्रवासाविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेऊ

कोबी ब्रायंटचा अल्प परिचय 

कोबी ब्रायंट याचा जन्म २३ ऑगस्ट १९७८ साली पेंसिल्वेनिया येथील फिलाडेल्फियामध्ये झाला होता. कोबी याचं वडील जेलीबीन ब्रायंट हे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे (एनबीए) माजी खेळाडू होते. जपानमधील एका प्रसिद्ध मांसाहारी पदार्थाच्या नावावरून कोबी याचं नाव ठेवण्यात आले होतं. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच ब्रायंट यानं फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. ब्रायंट याचे आजोबा त्याला एनबीए खेळांचे व्हिडिओ पाठवत असत. आणि ब्रायंट ते मन लावून पाहत असे. फुटबॉल या खेळावर असणाऱ्या अफाट प्रेमामुळेच ब्रायंट याचं जीवन पूर्ण बदलून गेलं होतं.

उच्च माध्यमिक शिक्षणादरम्यानच ब्रायंटने अंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली होती. एका नवीन विद्यार्थी खेळाडूच्या रूपात त्याने हायस्कुलच्या बास्केटबॉल टीममध्ये खेळण्यास सुरुवात केली होती.

हायस्कुलमध्ये आपल्यातील खेळाडूला नवी ओळख देत वयाच्या १७व्या वर्षी ब्रायंटने एनबीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एनबीच्या इतिहासात असा निर्णय घेणारा ब्रायंट हा सहावा खेळाडू ठरला.

१९९६ साली एनबीएच्या ५०व्या ड्राफ्टमध्ये कोबी ब्रायंट याच्या नावाचा समावेश करण्यात आला. दरवर्षी एनबीएच्या टीम्स कॉलेज व हायस्कुल पातळीवरील काही नवखे खेळाडू निवडतात. यात ब्रायंटचा समावेश करण्यात आला होता. तसंच ‘लॉस अँजलिस लेकर्स’ या ब्रायंटच्या आवढत्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आलं.

2001साली ब्रायंट याचा विवाह वैनेसा हिच्याशी झाला. ब्रायंटला चार मुली असून त्यातील १३ वर्षीय जिआना हीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला.

दिग्गज खेळाडूचा सफर

ब्रायंटने आपल्या बास्केटबॉल खेळाची जादू ही एनबीएमध्ये ही दाखवली. अर्थात फुटबॉल हे आपले जीवन समजणाऱ्या ब्रायंटने आपल्या खेळाची तशी जादूच सर्वांवर केली होती. आपल्या २० वर्षांच्या करिअरमध्ये ब्रायंट लॉस अँजलिस लेकर्स टीमसाठी खेळला.

२००८ साली ब्रायंटने एनबीएचा सर्वात महान खेळाडू असा किताब मिळवला. ब्रायंट याच्या नेतृत्वात २००८ आणि २०१२ साली त्याच्या टीमला ऑलम्पिकचे दोन सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर जागतिक स्तरावर ब्रायंट याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.

आजवरच्या आपल्या कारकिर्दीत ब्रायंट यानं उत्कृष्ट खेळ खेळला. मात्र २०१६ साली टोरंटो रॅप्टर्सविरुद्धच्या सामन्यात ब्रायंटने एक सामन्यात सर्वाधिक ८१ गुण मिळवले. विशेष म्हणजे निवृत्तीपूर्वीचा त्याचा हा अखेरचा सामना होता. त्याचवर्षी ब्रायंटने खेळातून निवृत्ती घेतली.

कोबी ब्रायंट ऑस्कर पुरस्काराचा मानकरी 

२०१५ साली ब्रायंटने बास्केटबॉलला एक प्रेम पत्र लिहले होते. या प्रेम पत्रावरून पुढे २०१७ साली ‘डिअर बास्केटबॉल’ हा शॉर्ट ऍनिमेटेड चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. याची कथा अर्थात ब्रायंटने स्वतः लिहली होती. या चित्रपटासाठी त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More