बावखळेश्वर मंदिर ट्रस्ट प्रकरण! गणेश नाईकांना हायकोर्टाचा पुन्हा दणका – eNavakal
News मुंबई

बावखळेश्वर मंदिर ट्रस्ट प्रकरण! गणेश नाईकांना हायकोर्टाचा पुन्हा दणका

मुंबई – नवी मुंबईतील महापे येथील ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रियल एरियामधील (टीटीसी) एमआयडीसीच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवरील अतिक्रमण करून बावखळेश्वर मंदिर ट्रस्ट केलेले बेकायदा बांधकाम जमीनदोस्त झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपावासी झालेल्या गणेश नाईकांच्या मागील शुक्लकाष्टके संपलेली नाहीत. गेली दहा वर्षे या ट्रस्टने सरकारी जमिनीचा बेकायदेशीर केलेल्या वापराचा मोबदला कसा वसुल केला जाणार? असा सवाल उपस्थित करून उच्च न्यायालयाने पालकमंत्री या नात्याने गणेश नाईकांसह बावखळेश्वर मंदिर ट्रस्टलाही नोटीस बजावण्याचे निर्देश हायकोर्टाने एमआयडीसीला दिले.
नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी एमआयडीसीच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवरील अतिक्रमण बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने बेकायदा केले. त्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने 2013 मध्ये कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतर गणेश नाईक यांचा वरदहस्त असलेल्या बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने हे मंदिर वाचवण्यासाठी वारंवार राज्य सरकारबरोबरच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंतही प्रयत्न केले.या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देेश उच्च न्यायालयाने 2 फेब्रुवारी 2018 रोजी पुन्हा दिले होते. मात्र, ट्रस्टने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर 8 ऑक्टोबर 2018 ला हे अपील फेटाळण्यात आल्याने ट्रस्टचा सर्वोच्च न्यायालयातील तिसरा प्रयत्नही निष्फळ ठरला.
त्यानंतरच्या कारवाईत कडक पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. बेकायदा बांधकाम जमीन दोस्त झाले. परंतू बांधकामाला वरदहस्त देणार्‍या अधिकार्‍यांचे काय ? त्यांच्या विरोधात कधी कारवाई केली जाणार? असा मुद्द उपस्थित करून संदीप ठाकूर यांनी नव्याने याचिका दाखल केली. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी एमआयडीसीने याप्रकरणातील दोषी अधिकार्‍यांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More