बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जागा आणि निधी देण्याचा निर्णय धोरणात्मक – eNavakal
News मुंबई

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जागा आणि निधी देण्याचा निर्णय धोरणात्मक

मुंबई,- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई महापौरांचा बंगल्यातील स्मारकाला जागा उपलब्ध करून देण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय कायदेशीर आहे. तसा त्यांना अधिकार आहे. यापूर्वी अशा प्रकारे काही संस्थांना निधी दिला आहे. राज्य सरकारचा हा धोरणात्क निर्णय आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात आव्हान देता येणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात घेतली.

शिवाजी पार्क येथील महापौरांच्या बंगल्यामध्ये उभारण्यात येणार्‍या स्मारकाविरोधात मानव जोशी यांच्या वतीने अ‍ॅड. उदय वारूंजीकर आणि आणि जनहित मंचचे अध्यक्ष भागवानजी रयानी यांच्या वतीने प्रदिप हवनूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठासमारे आज सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने युक्तीवाद करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला नाममात्र भाडेपट्टीवर जागा उपलब्ध करून देण्याची ही पहिलच वेळ नाही. यापूर्वीही अनेक संस्थांना अशा जागा देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने बाळासाहेब राष्ट्रीय स्मारक समितीचे उद्दीष्ट आणि सामाजिक भावना लक्षात घेऊन जाहीर केलेले 100 कोटी रुपये आणि 1 रुपया वार्षिक भाडेपट्टीने 30 वर्षांसाठी दिलेली महापौर बंगल्याची जागा योग्यच आहे. राज्य सरकारचा हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याला अशा पद्धतीने न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने आज न्यायालयात धेतली. याची दखल धेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांना यावर दोन आठवड्यांत म्हणणे मांडण्याचे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More