बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टला प्रतिवादी करा- हायकोर्ट – eNavakal
News न्यायालय

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टला प्रतिवादी करा- हायकोर्ट

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई महापौरांच्या बंगल्यातील स्मारकाला विरोध करणार्‍या जनहित याचिकेची न्यायालयाने आज दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.एम.जामदार यांच्या खंडपीठाने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या सदस्यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश आज याचिकाकर्त्यांना देऊन याचिकेची सुनावणी दोन आठवडे तहकूब ठेवली.
शिवाजी पार्क येथील महापौरांच्या बंगल्यामध्ये उभारण्यात येणार्‍या स्मारकाविरोधात मानव जोशी यांच्यावतीने अ‍ॅड. उदय वारूंजीकर आणि आणि जनहित मंचचे अध्यक्ष भगवानजी रयानी यांच्यावतीने प्रदिप हवनूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठासमारे आज सुनावणी झाली. सरकारी ट्रस्ट असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमध्ये 11 पैकी पहिल्या पाच ट्रस्टींमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उध्दव ठाकरे, नातू आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आणि विद्यमान मंत्री सुभाष देसाई आणि आर्किटेक्ट शशिकांत प्रभु यांचा समावेश असून त्यांचा कायमस्वरूपी ट्रस्टी म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या चार सचिवांचा ट्रस्टी म्हणून समावेश केला आहे. यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More