बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री  एकाच व्यासपीठावर – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री  एकाच व्यासपीठावर

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गेले काही दिवस युतीमध्ये कुरबुरी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर  बरेच दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री आमनेसामने आले होते. मात्र या भेटीत दोंघांमधील तणाव स्पष्ट जाणवत होता.

उद्धव ठाकरे यांनी स्मृती स्थळाचे आधी दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा स्मृती स्थळी आगमन झाले. मात्र  त्यावेळी उद्धव ठाकरे तिथे उपस्थित नव्हते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची  स्मृतीस्थळापर्यंत सोबत केली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचे  लोकार्पण महापौर बंगल्यामध्ये  करण्यात आले. तसेच शिवसेनेतर्फे २ कोटींचा धनादेश  मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीला मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला गेला.

यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. सरकार त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२३-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२०-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

शमीला वर्ल्ड कपसाठी पुरेशी विश्रांती मिळणार

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता किंग्स इलेव्हन पंजाब...
Read More