बाभुळगाव – बार्शी रोडवरील आगळगाव हद्दीत टेम्पो पलटी – eNavakal
अपघात महाराष्ट्र

बाभुळगाव – बार्शी रोडवरील आगळगाव हद्दीत टेम्पो पलटी

कुसळंब – बाभुळगाव बार्शी रोडवर आगळगाव हद्दीतून कामगारांना घेऊन जाणार टेम्पो चालकाने अतिवेगाने चालवून रोडच्या खड्यात आदळून टेम्पो पलटी होऊन १४ कामगार जखमी झाल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी घडली़. दिलीप नाना शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे़ बाभुळगावहुन बार्शी येथे नायलन दोरी तयार करण्याच्या कारखान्यात कामासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात झाला आहे़ यात सुलन प्रभाकर माने, संगिता दत्तात्रय शिंदे (वय ४५), राजेंद्र बाबुराव शिंदे  (वय ३९) ,अश्विनी कुंदन गांधले (वय २५) ,शिल्पा मच्छिंद्र शिंदे  (वय ३५), लता सुनील धावारे ( वय ४०), सारिका तानाजी मोरे (वय ३०),उषा राजेंद्र शिंदे (वय ३५) ,पुनम दिनकर शिंदे (वय २५), पद्ममिनी दिलीप शिंदे  (वय ३०), रोहिनी भालचंद्र आडसुळ (वय ३०), प्रभाकर गोरबा माने (वय ५५), चंद्रकांत बिभीषण माने (वय ४०), जिजाबाई चंद्रकांत माने (वय ३४) सर्व रा.बाभुळगाव ता. बार्शी हे जखमी झाले आहेत़ बाभुळगांवहुन बार्शीकडे निघालेल्या टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो क्रमांक एमएच १३ आर ०४८९ हे कामगार घेऊन जात होता़ यावेळी झिने वस्तीपासून दोन किमी अंतरावर आगळगांव शिवारात टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला़ या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा रूग्णालयात दाखल करण्यात आले़  याबाबत पांगरी पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ शैलेश चौगुले हे करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More