बाभळीच्या काट्यावर झोपून बाबाचा अघोरी उपवास! – eNavakal
News महाराष्ट्र

बाभळीच्या काट्यावर झोपून बाबाचा अघोरी उपवास!

अमरावती – आजवर बाबा बुवांना वेगवेगळ्या पद्धतीने कठोर साधना, तपस्या करताना आपण बघितले असेल. मात्र बाभळीच्या काट्यांवर साधना करताना क्वचितच बघितले असेल. अमरावतीच्या धरणी गावात अशा प्रकारची साधना करताना एक बाबा आढळून आला आहे. मनिराम बाबा असे या बाबाचे नाव असून गावातील कालीका मातेच्या मंदिरात ते पुजाअर्चा करतात. एवढेच नाही तर बाबाने  या साधने वेळी पोटावर दिवादेखील ठेवला होता.

बाभळीच्या काट्यावर झोपून या बाबाने तब्बल दीड दिवस अघोरी उपवास केल्याचे समजत आहे. ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर बाबाने आपला उपवास रद्द केला. या बाबाने बाभळीच्या काट्यांवर झोपून उपवासाला सुरुवात केली होती. परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना काट्यावरुन उतरण्यास भाग पाडले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी संपली! आज शाळेचा पहिला दिवस

मुंबई – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी आज शाळेत जाण्यास सज्ज झाले आहेत. विदर्भ वगळता आज १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिला तास भरणार आहे. नवा...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! दहशतवादी लपल्याची शंका

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आजही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून अनंतनाग भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. जावानांनी या भागात आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम...
Read More