बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ३० सप्टेंबरला निकाल, अडवाणींसह सर्व आरोपींना हजर राहण्याचे निर्देश – eNavakal
देश

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ३० सप्टेंबरला निकाल, अडवाणींसह सर्व आरोपींना हजर राहण्याचे निर्देश

नवी  दिल्ली – अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी अद्यापही निकाल राखीव ठेवण्यात आला असून ३० सप्टेंबर रोजी लखनऊचे विशेष सीबीआय कोर्ट याबात निकाल देणार आहे. या निकालासाठी न्यायाधीश एस.के.यादव यांनी निकालाच्या दिवशी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी एकूण ३२ आरोपी आहेत. यामध्ये तत्कालीन उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा हे आरोपी आहेत.

सहा डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी अयोध्येत मशीद पाडली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

“बचाव आणि अभियोग पक्षाचा युक्तीवाद एक सप्टेंबर रोजी संपला. त्यानंतर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी निकाल लिहायला सुरुवात केली. या प्रकरणात सीबीआयने न्यायालयासमोर ३५१ साक्षीदार आणि पुरावा म्हणून ६०० कागदपत्रे सादर केली” अशी माहिती सीबीआयचे वकिल ललित सिंह यांनी दिली.

या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी सीबीआय न्यायालयाला ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. पण त्यानंतर विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली. आडवाणी-जोशींशिवाय विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मशीद पाडणाऱ्या कार सेवकांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला होता.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ३० सप्टेंबरला निकाल, अडवाणींसह सर्व आरोपींना हजर राहण्याचे निर्देश

नवी  दिल्ली – अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी अद्यापही निकाल राखीव ठेवण्यात आला असून ३० सप्टेंबर रोजी लखनऊचे विशेष सीबीआय कोर्ट याबात निकाल देणार आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

‘अंनिस’च्या हस्तक्षेप याचिकेवर इंदोरीकर महाराजांचा आक्षेप

शिर्डी – कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हस्तक्षेप याचिका सादर केली होती. त्यावर इंदोरीकर महारांच्या वकिलांनी आक्षेप घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौरांना भाजपच्या ६५ नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं पत्र धाडलं

मुंबई – कोविड सेंटरच्या उभारणीचं कंत्राट मुलाला देणं, कंगना रानौतचं कार्यालय पाडणं आदी विषयांमुळे चर्चेत असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोविड योद्धेच कोरोनासंक्रमणात, गेल्या २४ तासांत २४७ पोलिसांना लागण

मुंबई – कोरोनाविरोधात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात २४७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

‘अर्थव्यस्थेला गती देण्याकरता खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं’, शक्तिकांत दास यांचे आवाहन

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थचक्र बिघडलं आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या प्रक्रियेत देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँक...
Read More