बागलाण तालुक्याला तहसीलदार मिळण्यासाठी मनसेचे जोरदार आंदोलन – eNavakal
News आंदोलन

बागलाण तालुक्याला तहसीलदार मिळण्यासाठी मनसेचे जोरदार आंदोलन

नाशिक – बागलाण तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत यासाठी आज मनसे कार्यकत्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करत प्रखर आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ सटाणा येथील कचेरी कार्यालय आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी प्रसंगावधान राखत आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या आठ कार्यकर्त्यांंना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे प्रखर जन आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष सतिश विसपुते,पंकज सोनवणे यांनी दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सटाणा तालुक्याला पूर्णवेळ तहसीलदार नाहीत.मालेगावचे जितेंद्र कूवर यांच्याकडे सटाणा तहसिलचा अतिरिक्त कारभार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची मोठी कुचंबना होत आहे.पूर्ण वेळ तहसिलदार नसल्याने नागरिकांची कामे रखडली जातात. नागरिकांची कुंचबना थाबांवी यासाठी सटाणा येथे पूर्णवेळ तहसीलदाराची नेमणूक करावी अशी मागणी अनेकदा नागरिकानी प्रशासनाकडे केली आहे. पंरतु प्रशासन याकडे गांभिर्याने बघत नसल्याने अखेर आज मनसेने कचेरी आवारात आंदोलन केले. यावेळी काहींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आंदोलनात सतिश विसपुते, पंकज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मंगेश भामरे, हेमंत इंगळे, निलेश नंदाळे, विश्वास खैरणार, वैभव सोनवणे, हर्षवर्धन सोनवणे आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More