बांबवडे गावामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्याची कारवाई सुरू ! शिवप्रेमींची निदर्शने ! – eNavakal
News Uncategoriz महाराष्ट्र राजकीय

बांबवडे गावामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्याची कारवाई सुरू ! शिवप्रेमींची निदर्शने !

कोल्हापूर – कोल्हापुरातील बांबवडे गावामध्ये मध्यरात्री अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चौकात बसविला. परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने तो हटविण्याची कारवाई पोलीस प्रशासनाने केली. यावेळी शिवप्रेमींनी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अटक करून गाड्यांमध्ये घालून नेले.पुतळा परवानगी न घेता बसविलेला असला तरी हा पुतळा शिवाजी महाराजांचा आहे त्यामुळे तो होऊ नये, अशी शिवप्रेमी आंदोलकांची मागणी होती. तसेच या बसविलेल्या पुतळ्याचे आम्ही संरक्षण करू, अशीही भूमिका आंदोलकांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना पांगवूनआणि अटक केली. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुतळा हटविण्याची कारवाई सुरू केली आहे.

कोल्हापुरात शाहुवाडी तालुक्यामध्ये बांबवडे हे गाव आहे. या गावात शिवरायांचा एकही पुतळा नव्हता. त्यामुळे अज्ञातांनी रविवारी मध्यरात्री गावाच्या चौकामध्ये शिवरायांचा हा पुतळा बसविला. परवानगीशिवाय पुतळा बसवल्याने तो हटवून पुन्हा परवानगी घेऊन पुतळा बसवावा, अशी प्रशासनाची आणि पोलिसांची भूमिका आहे.मात्र कोणत्याही परिस्थितीत पुतळा हलवू देणार नाही, आम्ही त्याचे संरक्षण करू अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली होती. हा पुतळा हटविला जाणार म्हणून त्यांनी पुतळ्याजवळ प्रचंड गर्दी केली होती. तर पुतळा सध्या हटवा. या पुतळ्यासाठी अनेक परवानग्या आवश्यक असतात. त्या मिळाल्यावर हा पुतळा बसवा.  हा पुतळा अशा अवस्थेत येथे ठेवणे उचित नाही, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यासाठीच त्यांनी कारवाई केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News Uncategoriz महाराष्ट्र राजकीय

बांबवडे गावामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्याची कारवाई सुरू ! शिवप्रेमींची निदर्शने !

कोल्हापूर – कोल्हापुरातील बांबवडे गावामध्ये मध्यरात्री अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चौकात बसविला. परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने तो हटविण्याची कारवाई...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ गुरुवारी मुंबईत धडकणार-हवामान विभागाचा अंदाज

मुंबई- बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ पुढील तीन दिवसांत म्हणजेच येत्या गुरुवारी, 15 ऑक्टोबरला मुंबईत धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

माहुरला रेणुका मातेचा नवरात्रौत्सव रद्द भाविकांनी दर्शनासाठी न येण्याचे आवाहन

नांदेड – महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी मुळपीठ माहूर गडावरील श्री रेणुका मातेचा यंदाचा नवरात्रौत्सव कोरोनामूळे रद्द करण्यात आला आहे. यावेळी शासनाच्या निर्देशानुसार केवळ अत्यंत...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेसला रामराम ठोकत अभिनेत्री खुशबू सुंदरांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली – तामिळनाडूमधील तामिळ अभिनेत्री आणि नेत्या खुशबू सुंदर यांनी आज सोमवारी  काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. खुशबू या काँग्रेसच्या राष्ट्रीय...
Read More
post-image
News देश

नीट परीक्षेचा निकाल १६ ऑक्टोबरला! सर्वोच्च न्यायालयाचे दिले निर्देश

नवी दिल्ली –  राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यूजी २०२० चा निकाल १६ ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला...
Read More