ढाका – २००४ साली झालेल्या शेख हसिना यांना लक्ष ठेऊन केलेल्या ग्रेनेड हल्ल्या प्रकरणातील निकाल बांगलादेशच्या एका न्यायालयाने आज जाहिर केला आहे. या निकालानुसार माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या मुलासह अन्य १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
२१ ऑगस्ट २००४ रोजी शेख हसिना यांच्या विरुद्ध कट रचून केलेल्या हल्यात २४ जणांचा मृत्यू झाला होता तर ३०० जण जखमी झाले होते. या हल्यात शेख हसीना जरी बचावल्या असल्या तरी त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीनंतर आज दोषींना शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये बांगलादेशच्या माजी गृहराज्यमंत्री लुफ्तोजमा बाबर यांच्यासह १९ जणांचा समावेश आहे. तर लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहत असलेले बीएनपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तारिक रेहमान यांच्यासह बाकी १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा हल्ला घडवण्यासाठी बीएनपी सरकारच्या प्रभावी गटाने हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. या हल्ल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले, हा हल्ला झाला तेंव्हा शेख हसिना या विरोधी पक्षनेत्या होत्या. तर बेगम खलिदा झिया पंतप्रधानपदी होत्या.
Bangladesh former prime minister Khaleda Zia’s son Tarique and 18 others given life sentence in 2004 grenade attack case: Bangladesh media
— ANI (@ANI) October 10, 2018