बहुप्रतिक्षित OnePlus7, OnePlus7 Pro भारतात लाँच – eNavakal
आघाडीच्या बातम्या तंत्रज्ञान देश

बहुप्रतिक्षित OnePlus7, OnePlus7 Pro भारतात लाँच

मुंबई – वनप्लसच्या ‘वनप्लस ६’ आणि ‘वनप्लस ६T’ ला ग्राहकांचा तुफान प्रतिसादानंतर बहुप्रतिक्षित OnePlus7 आणि OnePlus7 Pro हे स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाले आहेत. भारतासह अमेरिका आणि युरोपात एकाच वेळी आणि एकाच दिवशी म्हणजे 14 मे रोजी रात्री 8.15 वाजता हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले.

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 अशी या दोन्ही फोन्सची नावे आहेत. वनप्लस 7 प्रो मध्ये 8 कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर आहे. त्यासोबतच कंपनीने दावा केला आहे की, या मोबाईलची बॅटरी केवळ 20 मिनिटात 48 टक्के चार्ज होते. तसेच हा फोन गरम होऊ नये यासाठी यामध्ये लिक्विड कुलिंग ही सिस्टिम वापरण्यात आली आहे.

पहिल्यांदाच वनप्लसच्या मोबाईलमध्ये डॉल्बी सपोर्टेड स्पीकर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या कॅमेरामध्ये गुगल लेन्सचा सपोर्ट आहे. त्याच्या आधारे कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा फोटो काढल्यानंतर त्याच्याविषयी माहिती मिळवता येईल. यासह 6.7 इंचाचा FLUID AMOLED डिस्प्ले, ब्लु लाईट फिल्टर फोनच्या समोरील आणि मागील बाजूस Curved edges, Quad HD+Resolution असेल.


वनप्लस 7 प्रो किंमती


  • 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल : 48,999 रुपये
  • 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 52,999 रुपये
  • 12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 57,999 रुपये

वनप्लस 7 च्या किंमती


  • 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल : 32,999 रुपये
  • 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 37,999 रुपये

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More