बहुप्रतिक्षित iPhone 11, 11 Pro, 11 Pro Max लाँच – eNavakal

न्यूयॉर्क – जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने अॅपल टीव्ही, अॅपल वॉच, तसेच आयपॅडची सुधारित आवृत्ती सादर करत तंत्रज्ञान क्षेत्रात पुन्हा आघाडी घेतली आहे. अॅपलच्या अमेरिकेतील मुख्यलयात मंगळवारी पार पडलेल्या लाँचिंग सोहळ्यात संपूर्ण जगाचे प्रमुख आकर्षण असणारे आयफोन ११, आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे तीन नवे मॉडेल्स सादर करण्यात आले. तसेच जागतिक दर्जाचे शो, डॉक्युमेंटरीचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला करून देणाऱ्या अॅपल टीव्हीचीही घोषणा करण्यात आली. यासह अॅपल वॉच सिरीज ५ आणि सेव्हन जनरेशन आयपॅडही सादर करण्यात आला.

आयफोन ११ची भारतातील किंमत ६४,९९० रुपये, आयफोन ११ प्रोची किंमत ९९,९०० रुपये आणि आयफोन ११ प्रो मॅक्सची किंमत १,०९,९०० रुपये असणार आहे. भारतात १३ सप्टेंबरपासून या फोनची प्री बुकिंग सुरू होणार आहे. तर २० सप्टेंबरला हा फोन ग्राहकांना मिळू शकतो.

अॅपल टीव्ही – आयफोन, आयपॅड, अॅपल टीव्ही, आयपॉड टच तसेच मॅक या उपकरणांमध्ये अॅपल टीव्हीचा पर्याय देण्यात आला असून एक वर्षापर्यंत ते मोफत वापरता येईल. याशिवाय tvapple.com यावर प्रति महिना ४.९९ डॉलर मोजून ते वापरता येईल. यावर द मॉर्निंग शो, डिकिन्सन, सी, फॉर ऑल मॅनकाइंड, द एलिफंट क्वीन यांसारखे शो, चित्रपट व डॉक्युमेंटरी पाहता येईल. १ नोव्हेंबरपासून जगातील १०० शहरांमध्ये त्याचा प्रारंभ होणार आहे.

अॅपल वॉच – १८ तास चालणारी बॅटरी हे फाइव्ह जनरेशन अॅपल वॉचचे वैशिष्ट आहे. रॅटिना डिस्प्ले असलेल्या या वॉचमध्ये दिशादर्शनासाठी होकायंत्र (कम्पास) असून, फोनची सुविधा असलेल्या वॉचची किंमत ४९९ डॉलर तर, फोन नसलेल्या वॉचची किंमत ३९९ अमेरिकन डॉलर असेल. २० सप्टेंबरपासून हे बाजारात उपलब्ध होणार आहे.

सेव्हन जनरेशन आयपॅड – १०.२ इंच रेटिना डिस्प्ले असलेल्या या आयपॅडमध्ये ए-१० फ्युजन चिप वापरण्यात आली आहे. अॅपल पेन्सिलही या आयपॅडसाठी वापरता येईल. ३० सप्टेंबरला बाजारात दाखल होणाऱ्या या आयपॅडची किंमत ३२९ डॉलरपासून सुरू होईल. भारतात त्याची किंमत २९,९०० रुपये असेल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

मेकअप बॉक्स वाटल्याप्रकरणी प्रणिती शिंदेेंच्या अडचणीत वाढ

सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मेकअप बॉक्सचे वाटप केले असल्याचा आरोप...
Read More
post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More